दारूड्यांनी पोलीस ठाण्यातच घातला धिंगाणा

दारूड्यांनी पोलीस ठाण्यातच घातला धिंगाणा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस ठाण्याच्या (Rahuri Police Station) आवारात दि. 11 ऑगस्ट रोजी दारू पिऊन (drinking alcohol) आरडाओरडा करणार्‍या दोघाजणांवर राहुरी पोलिसांनी (Rahuri Police) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम नुसार कारवाई करून गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे.

दि. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान आरोपी तुकाराम राजदेव व संदिप राजदेव हे दोघे राहुरी पोलीस ठाण्याच्या (Rahuri Police Station) आवारात दारूच्या नशेत आले. त्यावेळी त्यांनी काहीतरी कारणावरून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग (Disruption of peace in public places) करून गैरवर्तन केले. राहुरी पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमनुसार कारवाई केली.

पोलीस हवालदार महेंद्र गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी तुकाराम रामकृष्ण राजदेव वय 35 वर्षे व संदिप नामदेव राजदेव वय 30 वर्षे दोघे रा. ब्राम्हणी, ता. राहुरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com