कुकाण्यात दारुच्या दुकानात चोरी

कुकाण्यात दारुच्या दुकानात चोरी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे दारुच्या दुकानात सुमारे 25 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुकाणा येथील हॉटेल व्यावसायिक अजीत अशोक मंडलिक (वय 40) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 5 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या देशी दारुच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून व परमिट बियरबारच्या पाठीमागील लोखडी व लाकडी दरवाजाचे आतील बाजूचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत पवेश करुन आतील सामानाची उचकापाचक करून 5 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 13 हजार 360 रुपये किमतीचे इम्पिरीयल ब्ल्यूचे दोन बॉक्स तसेच 6 हजार रुपये किमतीचे दोन्ही हॉटेलचे डीव्हीआर असा 24 हजार 860 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com