सव्वा लाखांची हातभट्टी जप्त!

पारनेर पोलिसांची शिरापूरमध्ये कारवाई
सव्वा लाखांची हातभट्टी जप्त!

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील शिरापूर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 1 लाख 14 हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू व त्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिरापूर गावच्या शिवारात आरोपी आनंद विठ्ठल उचाळे व मल्हारी उचाळे यांच्या उसाच्या शेताच्या लगत असलेल्या नाल्यांमध्ये संगनमताने बेकायदा 1 लाख 14 हजार रुपये किंमतीची गावठी दारू तसेच त्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मिळून आले. तसेच आरोपी साहित्यासह चोरून दारू विक्री करत असताना आढळून आले.

त्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल गहिनीनाथ यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत. तालुक्यात सध्या लॉकडाऊन असून गावठी हातभट्टीची दारू जोरात सुरू आहे. बेकायदा दारू तयार करून विक्रीचे प्रकार अनेक भागात होत आहेत.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे तालुक्यात बेकायदा गावठी हातभट्टी दारू बनवणार्‍या माफियांचे धाबे दणाणले असून यापुढे अशाच प्रकारे पोलिसांनी सातत्याने त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com