17 दारू अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई

46 हजारांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील अवैध व्यवसायांवर कर्जत पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तालुक्यातील विविध भागात पंधराच दिवसांत 17 दारूविक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करत 46 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

किरण संजय पिसे, बाळूराव हनुमंत वाघ (दोघेही कोरेगाव), महादेव संभाजी जाधव (रा.शिंपोरा), कैलास ज्ञानेश्वर कदम (रा.शिंदा), प्रशांत लहू गजरमल (रा.कुळधरण), रखम गोरख तांदळे (रा.जलालपूर), सुरत तात्या काळे (रा. नांदगाव), पूजा बिपीन पवार ,शाम अरुण भोसले (दोघेही रा. राशीन), सतीश तुकाराम विटकर (रा. बारडगाव सुद्रीक), कोंडीबा दत्तू पावणे (रा. पावणेवस्ती), महेंद्र गडिशा काळे (रा.धालवडी), बसंती सचिन भोसले, मंगल देविदास आगलावे (रा. दोघेही चिलवडी), देविदास कुंडलिक घेवंडे (रा.गायकरवाडी), जालिंदर रामा पवार (रा.आत्तारवाडा), तात्या निळ्या काळे (रा. नांदगाव) अशी कारवाई करण्यात आलेल्या दारूविक्रेत्यांची नावे आहेत.

या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या दारूविक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अमरजीत मोरे तसेच पोलीस जवान रवी वाघ, महादेव कोहक, भाऊ काळे, पांडुरंग भांडवलकर, राणी व्यवहारे यांनी ही कामगिरी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com