
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध दारू विक्रेते, व्यापारी बलजीतकौर रतनसिंग सेठी यांना आरोपी समीर सत्तार सय्यद रा. जय मल्हार बिल्डिंग समोर, मज्जिद जवळ, लालानगर, केडगाव, नगर या आरोपीने तब्बल 30 लाख 18 हजार 324 रुपयाला फसविले आहे.
याप्रकरणी काल बलजीतकौर रतनसिंग सेठी या दारू विक्री करणार्या व्यापार्याने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली की, आरोपी समीर सत्तार सय्यद याने कपील ट्रेडर्स मद्यविक्रीपोटीची वसूल झालेली रक्कम कपिल ट्रेडर्सच्या खात्यात जमा करणे आवश्यक असताना आरोपी समीर सत्तार सय्यद याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कपील ट्रेडर्स या दारू विक्री करणार्या फर्मची फसवणूक करण्याचे इराद्याने अनाधिकाराने स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करून आर्थिक नुकसान केले.
याप्रकरणी सेठी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद विरुद्ध भादंवी कलम 420, 406, 464, 468 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपाल हे. कॉ. खेडकर करीत आहेत.