तळीरामांच्या ‘सोयी’ला चार तासांचे वेसण !

तळीरामांच्या ‘सोयी’ला चार तासांचे वेसण !

राज्य उत्पादन शुल्कचे आदेश ; घरपोहचसाठी नवी गाईडलाईन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील परवानाधारक दारू विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोहोच मद्य विक्री करण्यास

तसेच देशी, विदेशी मद्यांच्या ठोक विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदीचे कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील परमीट रूम, बार यांना आपल्या दुकानातून दारू विक्रीस बंधने घातली आहे. यामुळे तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. परंतू, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्कचे अधीक्षक पाटील यांनी एक आदेश काढून करोना नियमांचे पालन करून सकाळी 7 ते 11 यावेळत घरपोहच मद्य विक्री करण्यास मुभा दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com