आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीचे सोमवारी सोनईतून प्रस्थान

आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीचे सोमवारी सोनईतून प्रस्थान
(File Photo)

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-आळंदी ते पंढरपूर यात्रा पायी दिंडी सोहळा सोमवार दि. 20 जून ते दि. 11 जुलैपर्यंत होणार असल्याची माहिती सोनई येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळा कमिटीच्यावतीने देण्यात आली असून नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

मंत्री शंकरराव गडाख व सुनीताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वासराव गडाख, रामेश्वर महाराज कंठाळे, प्रल्हाद महाराज गायकवाड, भागवताचार्य तुळशी देवी, ज्ञानेश्वर महाराज गुडदे व सविताताई दरंदले यांनी आयोजन केले आहे. दि. 20 जून रोजी सकाळी 9 वाजता महादेव मंदिर येथून दिंडीचे श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान होणार आहे.

रोज पहाटे काकड आरतीनंतर दिंडी प्रस्थान होऊन दुपारी 12 ते 1 जेवण नंतर विश्रांती 3:30 ते 6 प्रवास 6:30 ते 7:30 हरिपाठ व भोजन रात्री आठ ते दहा हरिकीर्तन होणार आहे.

सोनई गावाच्या जडण-घडणीमध्ये महत्त्वाचे कार्य केलेले तसेच आध्यात्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सोपानराव दरंदले यांना या दिंडी कमिटीच्या वतीने कार्यक्रम पत्रिकेतून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com