‘अक्षय्य’ खरेदीची झुंबड

वाहन, सोने, प्रॉपर्टी बाजारात मोठी उलाढाल
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर बाजारपेठेला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. अक्षय्य मुहूर्तावर (Akshaya Tritiya) वाहन व सोने खरेदी, घर-प्लॅट, जमीनींचे सौदे आणि मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारात कोट्यवटींचे भांडवल फिरले. मोबाईल (Mobiles) व इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) वस्तूच्या विक्रीतही उसळी दिसून आली.

File Photo
श्रीरामपूरच्या माहेरवाशिणवर जादूटोणा, छळ

यंदा अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) व रमजान ईद (Ramadan Eid) हे सण एकाच दिवशी आले. या सणांच्या निमित्ताने नगरच्या बाजारपेठांत (Nagar Market) आठवडाभरापासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. तीन-चार दिवस कापड बाजारात दिसलेल्या या गर्दीने अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठी उलढाला होणार, याचा अंदाज दिला होता. शनिवारी वाहन (vehicle)आणि सोने (Gold) बाजारात मोठी गर्दी (Crowd) दिसून आली. सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 59600 ते 60 हजारांदरम्यान होता. अनेकांनी मुहूर्तावर हिर्‍यांच्या दागिन्यांचीही खरेदी केल्याची माहिती मल्टीस्टोअर सोने विक्रेत्यांकडून मिळाली.

File Photo
संगमनेरात लाचखोर तलाठी पकडला

वाहन बाजारात गेल्या काही दिवसांपासून चार चाकी गाड्यांचे नवे व्हेरियंट, फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर करणे सुरू आहे. काही कंपन्यांनी अद्याप प्रत्यक्ष लॉन्च न झालेल्या नव्या गाड्यांसाठी बुकींग सुरू केले होते. या बुकींगला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला.

File Photo
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अजित पवारांची बदनामी - बावनकुळे

अनेक चारचाकी वाहनांसाठी ग्राहकांना 2 ते 3 महिन्यांचा वेटींग पिरीयडचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधीच बुक केलेले चारचाकी वाहन घेण्यासाठी गर्दी दिसून आली. दुचाकी बाजारात यंदा 150 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या आणि स्कूटरेट गटातील 125 सीसी सेगमेंटच्या वाहनांना नगरकरांनी पसंती दिली.

File Photo
राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांजवळील फलक व अतिक्रमणे रडारवर

आंबा खरेदी जोरात

अक्षय भोजनासाठी आंब्याचा रस (Mango Juice) सर्वांची विशेष पसंती असल्याने कालपासूनच आंब्याला उठाव आला होता. लालबाग 100 रूपये किलो दरम्यान विकला गेला. केशर आंब्याला (Mango) 150 ते 200 किलो भाव होता. हापूस 600 ते 800 रूपये डझन दराने विक्री झाला. दरम्यान, पुढील दोन दिवसांत आंब्याचे दर 10 ते 15 टक्के घसरतील, असा अंदाज आहे.

File Photo
जिल्ह्यात आयटी पार्कसह पर्यटन व्यवसाय विकसित करणार - ना. विखे
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com