अक्षय तृतीयामुळे बाजारपेठेला सुवर्ण झळाळी !

दर कमी झाल्याने ‘मुहूर्ता’ सह लग्नसराईसाठी सुवर्ण अलंकारांना मागणी
अक्षय तृतीयामुळे बाजारपेठेला सुवर्ण झळाळी !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वर्षानंतर पूर्ण उठलेले कोविड निर्बंध (Covid Restrictions), अक्षय तृतीयाचा मुहूर्त (Akshay Tritiya), येणारी लग्नसराईचे दिवस यामुळे नगरच्या बाजारपेठेला (Nagar Market) मंगळवारी सुवर्ण झळाळी दिसून आली. त्याच सोबत 51 हजार 500 पर्यंत खाली आलेल्या सोन्यांचे दर (Gold Rate) याचा फायदा घेत नगरकांनी मंगळवारी दिवसभर सुवर्ण अलंकार खरेदीसाठी गर्दी केली (Crowds to Buy Gold Ornaments) होती. यंदाच्या सोने खरेदीचे (Gold Purchase) वैशिष्ट म्हणजे हस्तकला, कमी वजनाच्या दागिण्यांना (Jewelry) मोठी मागणी असल्याचे नगरच्या सुवर्णकार बंधूनी सांगितले. यासह दुचाकी (Bike), चार चाकी (Car), कापड खरेदीचे प्रमाण देखील चांगले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे बाजारपेठेला कोट्यावधी रुपयांचा बुस्टर डोस मिळाला असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मुहूर्ताच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळेच नुकत्याच झालेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने-चांदी ( Gold-silver) आणि वाहन खरेदीला (Vehicle Purchase) प्राधान्य दिले होते. आता अक्षय तृतीया आणि लगचे सुरू होणार्‍या लग्नसराईच्या हंगामामुळेही ग्राहकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिल्याने नगरच्या सराफ बाजाराला झळाळी मिळाली. तीन आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेले सोन्यांचे दर (Gold Rate) मंगळवारी जवळपास तीन हजार रुपये प्रति दहा ग्रॅमने कमी झाले आहेत.

चोवीस कॅरेटचे स्टँडर्ड सोने 51 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे; तर चांदीचा दर (Silver Rate) 63 हजार 500 रुपये होते. यामुळे नगरमध्ये सुवर्ण अलंकारातून मोठी उलाढाल झाली. यात लग्नसराईमुळे अंगठी, मंगळसुत्र, वेगवेळ्या कमी वजनाच्या दागिण्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. त्याच सोबत 10 ते 15 वर्षापूर्वी डायमंडच्या दागिण्यांकडे पाठ फिरवणारे ग्राहक आता आवजून डायमंडच्या दागिण्यांना पंसती देत असल्याचे नगरच्या सुवर्णकार बांधवांनी सांगितले.

मुहूर्ताच्या निमित्ताने गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवरही ग्राहकांनी भर दिला. या वस्तूंच्या बाजारपेठांमधेही लगबग दिसली. उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने वातानुकूलित यंत्रणा (एसी), कूलर आणि रेफ्रिजरेटरला मोठी होती. त्याचबरोबर जुन्या वस्तूंच्या जागी नवीन वॉशिंग मशिन, टीव्ही आदी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदीचाही ट्रेंड दिसून आला. करोनाच्या उद्रेकामुळे दोन वर्षे थंडावलेली बाजारपेठ यंदा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने चांगली खुलल्याचा विश्वास व्यापार्‍यांनी व्यक्त केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी हक्काचे घर घेण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र, वाढलेल्या स्टीलच्या दरामुळे घरांच्या किंमतीवर त्याचा परिणाम दिसत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

दुचाकी वाहनांना मंगळवारी चांगली मागणी होती. मात्र, चार चाकी वाहनांसाठी तीन ते आठपर्यंत वेटींग कायम आहे. सध्याचे बाजारपेठेतील चित्र उत्साहवर्धक आहे. दिवसभर नगर शहरातील दुचाकी शोरूमध्ये दुचाकी वाहनांची चांगली विक्री झाल्याचा अंदाज आहे. भविष्यात हा आशावाद काम राहिल, असे वाटते.

- विजयकुमार गडाख, संचालक, इलाक्षी शोरूम.

सुवर्ण बाजारपेठे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला होता. सोबत जोडून येणार्‍या लग्नसराईमुळे ग्राहकांची सुवर्ण अंलकार खरेदीसाठी गर्दी झाली होती. अंगठी, मंगळसुत्र यासह कमी वजनाच्या दागिण्यासोबत डायमंडच्या दागिण्यांना चांगली मागणी होती. सुवर्ण बाजारपेठेसोबत बाजारात अन्य वस्तूच्या खरेदीमुळे बाजारपेठेला बुस्ट डोस मिळेल.

- सागर कायगावकर, संचालक कायगावकर ज्वेलर्स.

दोन वर्षानंतर सर्व निर्बंध उठल्याने ग्राहकांनी सुवर्ण अंलकार खरेदीसाठी खरेदी केली असल्याचे मंगळवारी पहावास मिळाले. गुढीपाडव्यापेक्षीही काल चांगल्या प्रकारे ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. पुरूषमध्ये चेन, अंगठी यासह महिलांमध्ये कमी वजनाच्या दागिण्यांना मागणी होती.

- आनंद कोठारी, संचालक, चंदूकाका ज्वलर्स.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com