अकोळनेरला महिलेचा गळा दाबून चोरले दागिने

अकोळनेरला महिलेचा गळा दाबून चोरले दागिने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरात घुसून महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 43 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. अकोळनेर (ता. नगर) येथील रेल्वे स्टेशन जवळील पवार वस्ती येथे गुरूवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीता अजित पवार (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील जिन्यामधून घरात प्रवेश केला. फिर्यादीचा गळा दाबला व दीड तोळ्यांचे दागिने हिसकावून घेतले. तसेच फिर्यादीच्या पतीच्या खिशातील नऊ हजारांची रोख रक्कम, मोबाईल चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत.

Related Stories

No stories found.