दोन वर्षे खंडित काठ्याची यात्रा उत्साहात

डोक्यावर पेटते कठे घेवून हजारो भाविकांनी बिरोबाला केला नवस
दोन वर्षे खंडित काठ्याची यात्रा उत्साहात

अकोले |प्रतिनिधी| Akole

कोविड मुळे दोन वर्षे खंडित असणारी अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध कठ्याची यात्रा यावर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. भाविक डोक्यावर पेटते कठे घेवून पारंपरिक वाद्याच्या साथीने बिरोबाच्या मंदिराला फेर्‍या मारत असल्याचे अद्भुत दृश्य परत एकदा भाविकांना पाहायला मिळाले.

अकोले तालुक्यातील राजूर जवळ कौठवाडी येथे बिरोबा देवाची यात्रा भरते. मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद दैवताच्या नावाचा जय घोष, संबळ, पिपाणी, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेला गझल आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने हाई असली पद्धती तयार करतात. भाविक बिरोबाचा गजर करत होते. अक्षय तृतीया नंतरच्या पहिल्या रविवारी कौठवाडी येथे बिरोबाची मोठी यात्रा भरली होती. आदिवासी समाजाने आजही आपल्या रूढी परंपरा संस्कृती यांचे जतन केले आहे.

आराध्य दैवत बिरोबा हा नवसाला पावतो, अशी आदिवासी समाजाची श्रद्धा आहे. लोकांचे नवस पूर्ण होतात ते अक्षयतृतीया नंतरच्या रविवारी नवस पूर्ण करण्यासाठी यात्रेला येतात. यावेळी अशी श्रद्धा आहे की, ज्या नागरिकांचे अंगात देवी संचार होतो ते डोक्यावर उकळते तेल व पेटते निखारे भरलेले कठीण डोक्यावर घेऊन बिरोबाचा नावाचा जयघोष करत पारंपारिक वाद्यांच्या गजरात ‘हाय’ असा चीत्कार करत मंदिराला गोल फेरी मारत होते हा चित्तथरारक सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

गावातील पंचक्रोशीतील नोकरी आणि कामधंद्यासाठी बाहेरगावी असलेले नागरिक या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित होतात. यात्रेसाठी बिरोबा देवस्थान व आयोजकांनी सर्व यात्रेकरूंना कार्यक्रम पाहणे व दर्शन सुलभ व्हावे अशी व्यवस्था केली होती. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

No stories found.