अकोलेमध्ये 27 व 28 रोजी रंगणार कुस्त्यांचा थरार

महाराष्ट्र केसरीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून पैलवान निवडणार
अकोलेमध्ये 27 व 28 रोजी रंगणार कुस्त्यांचा थरार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका तालीम संघाच्यावतीने आणि अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले मध्ये दि.27 व 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र केसरी निवडीसाठी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अकोले तालुका तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ व उपाध्यक्ष शामराव शेटे यांनी दिली.

या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याहस्ते व माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आ. प्रा.राम शिंदे, भाजप अहमदनगर जिल्हा तालीम संघ अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, ज्येष्ठ विचारवंत एस.झेड. देशमुख, अ‍ॅड.श्रीराम गणपुले, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, बी.जे. देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गोरक्षनाथ बलकवडे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष गिरजाजी जाधव, ज्येेष्ठ नेते शिवाजी धुमाळ, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड के.डी.धुमाळ, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, नगराध्यक्ष सौ.सोनालीताई नाईकवाडी, उप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक राजाभाऊ गोडसे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालीम संघाचे तालुकाध्यक्ष,आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी यंदा खुल्या पध्दतीने निवड केली जाणार आहे.अहमदनगर जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीसाठी निवड करण्यासाठी या स्पर्धा दि. 27 व 28 नोव्हेंबर रोजी अकोले शहरात होणार आहेत. यामधून गादी आणि माती विभागात या निवडी केल्या जाणार आहेत.

यापूर्वी तालुक्यातच मल्ल भिडायचे. त्यामुळे एखादा चांगला मल्ल असेल तर तो तालुक्यातच पराभूत झाला तर त्याला पुढे संधी मिळत नसे.त्यामुळे यावर्षी खुल्या पध्दतीने निवड चाचणी स्पर्धा ठेवल्यामुळे सर्वांना समान संधी मिळणार आहे.

निवड चाचणीमध्ये वरिष्ठ विभागातील जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना यात सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तालुका तालीम संघाच्या तालुकाध्यक्षांच्या सहीचे ओळखपत्र बंधनकारक आहे. या कुस्ती स्पर्धेचे निवेदक 32 वर्षे 4000 मैदाने आपल्या आवाजाने गाजविणारे कुस्ती निवेदक कोल्हापूर येथील पै.शंकर अण्णा पुजारी हे करणार आहेत.

निवड चाचणीसाठी वजनगट

महाराष्ट्र केसरी गटासाठी एक गट आहे, त्या शिवाय 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 या वजनी गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. वजनासाठी वेगवेगळी वेळ निश्चित केलेली आहे. गादी विभागातील निवड चाचणी दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 तर माती विभागातील निवड चाचणी दि.28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com