अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले येथे विहीरीत पडलेल्या उदमांजरास वनविभागाने शिफातीने बाहेर काढून निसर्गात मुक्त केले.

अकोले येथे बसस्थानकाजवळ दत्ता धुमाळ यांचे मातोश्री कॉम्प्लेक्स आहे. पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये वास्तव्यास असणार्याना पाणीपुरवठा हा दत्ता धुमाळ यांच्या मालकीच्या 70 मीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीतून होतो. नेहमी प्रमाणे दत्ता धुमाळ हे पाण्याची मोटार चालू करण्यास गेले असता त्यांना विहिरीत उदमांजर पडल्याचे दृष्टिक्षेपास पडले.

त्यांनी लागलीच त्यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये वास्तव्यास असलेल्या वनरक्षक दुर्गादास पाटील यांना मोबाईल वर संपर्क साधताच श्री. पाटील यांनी वनरक्षक अंकुश काकड व वनरक्षक डी. बी. कोरडे यांना संपर्क साधला. त्यांनी तत्परता दाखवत शिताफीने घटनास्थळी धाव घेतली व प्लॉस्टिक चे कॅरेट विहिरीत सोडून अलगदपणे उदमांजर विहिरी बाहेर काढले. तदनंतर त्याच्या आधिवासात सदर पिल्लास सोडण्यात आले.

घटनास्थळी जमलेल्या जमावाने वनविभागाचे आभार मानत कौतुक केले. यावेळी वनपाल भाऊसाहेब पारधी घटनास्थळी हजर होते. भारतात या ळपवळरप लर्ळींशीं च्या 8 जाती आहेत आणि नामशेष होत आहे दुर्मिळ होत चाललेल्या आहेत.