अकोले : ग्रामीण भागातील विविध घटकांचा 
 'फ्रंटलाईन वर्कर्स' मध्ये समावेश करावा

अकोले : ग्रामीण भागातील विविध घटकांचा 'फ्रंटलाईन वर्कर्स' मध्ये समावेश करावा

अकोले (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील विविध घटकांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर मध्ये समावेश करून त्यांना तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सरकार 45 वर्षे वयोगटाच्या पुढील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करत आहेत ही बाब समाधानाची आहे. परंतु फ्रंटलाइन वर्कर म्हणून ग्रामीण भागातील अनेक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. परंतु सरकार त्यामध्ये गांभीर्याने लक्ष देत नाही. शहरी पातळीवरील फ्रंटलाइन वर्कर चे निकष हे ग्रामीण भागासाठी उपयोगाचे नाही.

ग्रामीण भागामध्ये फ्रंटलाइन वर्कर अनेक घटकांचा समावेश होतो. या मध्ये कृषी सेवा केंद्राचे मालक व तेथील कर्मचारी, ग्रामीण भागातील विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठविणारे पत्रकार, दुध संस्थांचे सेक्रेटरी व त्यामध्ये पूर्णवेळ काम करणारे संचालक मंडळ, तसेच गावोगावी सोसायटी मध्ये धान्य वितरीत करणारा संस्थेचा कर्मचारी,

शेतकर्‍यांना कर्ज पुरविणार्‍या संस्थेतील सेक्रेटरी, भाजीपाला दुध व इतर अत्यावश्यक साहित्यांचे माल वाहणार्‍या गाड्यांचे मालक व चालक, गावोगावी फिरून शेतकर्‍यांना पशुवैद्यकीय सेवा देणारे पशुवैद्य व त्यांच्या त्यांच्यासोबत फिरणारे कंपाऊंडर, ग्रामीण भागातील बँक व पतसंस्थेतील कर्मचारी सर्व ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचारी, किराणा दुकानाचे मालक व त्यामध्ये काम करणारे कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पेट्रोल पंपाचे मालक व कर्मचारी वर्ग, शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक्टर चालक,

कृषी समितीमध्ये काम करणारे कर्मचारी व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, वर्तमान पत्रे वाटप करणारे कर्मचारी, बस चालक व वाहक, घरपोच अन्न पोहचविणारे, पार्सल सेवा देणारे कामगार, दूध उत्पादक शेतकरी व असे अनेक वर्गाचा समावेश फ्रंटलाइन वर्कर यादीमध्ये करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे जेणेकरून जनतेशी थेट संपर्क असणार्‍या सर्व घटकांचा लसीने संरक्षण जर दिले तर भविष्यामध्ये येणार्‍या तिसर्‍या लाटेमध्ये ही लोक निर्भीडपणे समाजाची सेवा करतील. शासनाने तातडीने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेशराव नवले, म्हाळादेवी येथील खंडेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे, मनसे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, अमोल पवार, स्वप्नील नवले, गणेश तोरमल, बाळासाहेब नवले, डॉ. महेश उघडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com