अकोलेत सलग तिसर्‍या दिवशी अवकाळी पाऊस
पाऊसRain

अकोलेत सलग तिसर्‍या दिवशी अवकाळी पाऊस

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात सलग तिसर्‍या दिवशी बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकरी सलगच्या पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

शुक्रवारी, शनिवारी व काल रविवारी असे तीन दिवस सलग अवकाळी पाऊस पडला. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साठले होते.उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थंडावा वाटत असला तरी शेतकरी मात्र मेटा कुटीस आला आहे. अकोले शहरासह तालुक्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली आहे.

अकोले शहरासह इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, बहिरवाडी, खानापूर, आगर, टाकळी, ढोकरी, सुगाव, रेडे, कुंभेफळ येथे पाऊस पडला. या पावसामुळे शेतकर्‍यांचे टोमॅटो, झेंडू, पानगळ केलेले डाळींब, उशिरा लागवड केलेला उन्हाळी कांदा व वेल वर्गीय पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यात ऊस सोडता सर्व चारा पिके जमीनदोस्त झाले आहेत. शेतातील बांधावर असणार्‍या आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात गळती झालेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com