अकोले तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

अकोले तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात बहुतेक ठिकाणी काल बुधवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिट झाली आहे. करोनाच्या संकटामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांचे या पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता, सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटात पावसास सुरुवात झाली.सुमारे तास दीड तास चांगला पाऊस पडला. या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कसळत होत्या.

अकोले शहरासह तालुक्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली आहे. अकोले शहरातील काही भाग, खानापूर, आगर, टाकळी, ढोकरी, सुगाव, रेडे, कुंभेफळ येथे सुरुवातीला गारा पडल्या. या पावसामुळे शेतकर्‍यांचे शेतीचे संपूर्ण बजेट कोलमडून पडणार आहे.

अकोले तालुक्यात टोमॅटो, झेंडू, पानगळ केलेले डाळींब, उशिरा लागवड केलेला उन्हाळी कांदा व वेल वर्गीय पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यात ऊस सोडता सर्व चारा पिके जमीनदोस्त झाले आहेत. शेतातील बांधावर असणार्‍या आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात गळती झालेली आहे. एकूणच शेतकरी जमीन दोस्त झालेला आहे.

- महेशराव नवले, संस्थापक अध्यक्ष, युवा स्वाभिमान संघटना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com