कृष्णवंतीच्या पात्रात वाहून गेलेल्या नाशिकच्या 'त्या' वयोवृद्धाचा मृतदेह सापडला

कृष्णवंतीच्या पात्रात वाहून गेलेल्या नाशिकच्या 'त्या' वयोवृद्धाचा मृतदेह सापडला

अकोले ( प्रतिनिधी)

भंडारदऱ्या जवळ कृष्णवंतीच्या पात्रात वाहून गेलेल्या नाशिक येथील वयोवृद्ध तुकाराम रामदास सांगरे (वय 70) यांचा मृतदेह आज रविवारी सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान नदी पात्रात तीन दिवसानंतर सापडला.

राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

शुक्रवारी रात्री कृष्णवंती नदीत गाडी कोसळली. त्या अपघात ग्रस्त ठीकानाजवळ लघु शंकेसाठी सांगरे उतरले होते, त्याठिकाणी पाय घसरल्याने ते नदीत पडले आणि वाहून गेले.

शुक्रवारी रात्री आठ साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तेंव्हापासून राजूर पोलीस कर्मचारी, वन्यजीव, महसूल विभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते.

अखेर तिसऱ्या दिवशी आज रविवारी सकाळी वाकी शिवारात नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com