राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला

युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांची हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्याचे (Akole Taluka) आमदार डॉ.किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांनी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत (Farmer leader Dashrathrao Sawant) यांच्या विषयी वादग्रस्त विधान आमदार डॉ.किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांनी केल्याचा आरोप (Allegations) करत त्यांच्या 'त्या' वादग्रस्त विधानाचा सोशल मीडियावर जाहीर निषेध (Public Protest on Social Media) करणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर (NCP Ravindra Malunjkar) यांनी केल्याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार (Kapil Pawar) यांनी मालुंजकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत आता रवींद्र मालुंजकर काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला
टेलटँकमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

याबाबत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर (Rajendra Kumkar) म्हणाले की, रवींद्र मालुंजकर यांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व आमदार डॉ.किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांना अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. त्यामध्ये महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याशीही कोविड काळात आयोजित आढावा बैठकीत हुज्जत घातली होती. श्री .मालुंजकर यांना अनेक वेळा या बाबत समज देण्यात आली होती. मात्र त्यांच्या वागण्यात कोणताही फरक पडला नसल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे कुमकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला
कोर्टाच्या आवारात पेटवून घेणार्‍या राहुरीतील युवकाचा मृत्यू

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस विकास बंगाळ,युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, महिला पदाधिकारी हे उपस्थित होते.दरम्यान आ डॉ किरन लहामटे यांनी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्या बद्दल कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान अथवा टीका टिपण्णी केली नसतांना काही राजकीय शक्ती त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा काही आमदार समर्थकांनी केला आहे.

तालुक्यातील जेष्ठ शेतकरी नेते यांना धरणात उडी मारून मर म्हणणाऱ्या आमदार डॉ. किरण लहामटे यांचा काँग्रेसचे कार्यकर्ते मारुती शेंगाळ ,सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य यांनी सोशल मीडियावर केला आहे.

रवींद्र मालुंजकर यांच्या सारख्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या युवक तालुकाध्यक्षा ची पक्षातून हकालपट्टी होत असेल तर ही बाब दुर्दैवी आहे.मात्र अनेक पक्षाशी एकनिष्ठ नसलेले व आमदारांना अडचणीत आणनाऱ्यांना पक्षात मोठे मानाचे स्थान दिले जाते.या बाबत पक्ष काय कारवाई करणार असा जाहीर सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही युवक सोशल मीडियावर करतांना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com