अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा धुरळा; आतापर्यंतच्या निकालात कोणाची बाजी? वाचा एका क्लिकवर

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा धुरळा; आतापर्यंतच्या निकालात कोणाची बाजी? वाचा एका क्लिकवर

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील 41 ग्रामपंचायतच्या मतमोजणीला आज सकाळी तहसील कार्यालयात सुरुवात झाली. सुरुवातीला जाहीर झालेल्या निकालात अनेक ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणूकीत अपक्षांनी बाजी मारली आहे. तर खिरविरे, मुथाळणे या मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकविला आहे. तर मवेशीमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायत साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील जामगाव, शेलद, खुंटेवाडी, सावरकुटे या चार ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. उर्वरित 41 ग्रामपंचायत साठी काल रविवारी शांततेत मतदान पार पडले. आज सकाळी 10 वाजता अकोले तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. मुथाळणे ग्रामपंचायत च्या 10 पैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

म्हाळुंगी ग्रामपंचायत निवडणूक सरपंचपदी भाजपाचे मदन निवृत्ती मेंगाळ विजयी झाले असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय अस्वले यांचा पराभव केला आहे. विजयी उमेदवार जल्लोष करत आहेत. माजी आमदार वैभवराव पिचड व आमदार डॉ किरण लहामटे हे आपआपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित आहेत. अधिकृत पक्षाचे सरपंच म्हणून विजयी झालेल्या उमेदवार रांचा पक्षांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. अनेक सरपंचपदाचे विजयी झालेले उमेदवार हे कोणत्या पक्षा कडून अधिकृतरित्या विजयी झाले हे सांगत नाहीत.काही जण अपक्ष असल्याचे स्पष्ट बोलत आहेत.

म्हाळुंगी : मदन निवृत्ती मेंगाळ - सरपंच (भाजप)

खिरविरे : गणपत डगळे - सरपंच (भाजप)

मुथाळणे : सुनंदा अशोक गावंडे - सरपंच (भाजप)

धामणवन : मनीषा पोपट चौधरी(राष्ट्रवादी-भांगरे गट)

सांगवी : सौ मनीषा शांताराम मेंगाळ( अपक्ष )

तेरुंगण : मच्छिन्नद्र देवराम कोकतरे( अपक्ष )

केळी - रुम्हणवाडी : सरपंच - मुरलीधर चिमा मेंगाळ(अपक्ष)

मवेशी : सरपंच- यमाजी भिवा मेंगाळ (राष्ट्रवादी)

पाडोशी : सरपंच -दत्तु कुलाळ ( अपक्ष)

तळे : सरपंच - हाैशिराम वेडे (राष्ट्रवादी)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com