अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत.अनेक ठिकाणी प्रस्थापितां विरुद्ध तरुणांनी कडवी झुंज दिल्याचे चित्र दिसत आहे.

वीरगाव येथे भाजपचे जि.प. मधील गटनेते जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचौरे व अगस्ति कारखान्याचे संचालक रामनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रा पं वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून येथे महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले गिरजाजी जाधव यांच्या हातून आंबड गावची सत्ता खेचण्यात सत्ताधारी महाविकास आघाडीला यश आले. तर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांनी आपल्या कळस गावची सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे. विजयानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी पत्रकारांना मतमोजणी स्थळी सोडन्यास नकार दिल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

कोतुळ येथे जि प चे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख व अगस्ति कारखान्याचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला 13 तर विरोधी जि प सदस्य रमेशराव देशमुख यांच्या पॅनलला अवघ्या 4 जागांवर यश मिळविता आले.