अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद चिघळणार; चर्चा निष्फळ

आंदोलन सुरूच ठेवण्याचा बचाव कृती समितीचा निर्णय, सत्तारूढ गटही प्रति आंदोलनाच्या तयारीत
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद चिघळणार; चर्चा निष्फळ

अकोले (प्रतिनिधी)

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी (Akole Taluka Education Society) बचाव समितीच्या सुरू असलेल्या कृती धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) व कार्यकारी मंडळ यांची आंदोलकांशी तब्बल दीड तास चर्चेनंतरही कृती समितीने आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजची चर्चा निष्फळ ठरली आहे.

दरम्यान संस्थेतील सत्ताधारी गटाकडूनही या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. आंदोलकांचे बहुतांश मुद्दे मान्य केल्यानंतरही आंदोलकांनी आठमुठेपणाने आंदोलन सुरू ठेवल्याचा आरोप अकोले तालुकाएज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी केला आहे.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद चिघळणार; चर्चा निष्फळ
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

अकोले महाविद्यालयासमोर आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली काही राजकीय कार्यकर्त्यांनी काल गुरुवार पासून धरणे आंदोलन सुरु केले. या पार्श्वभूमीवर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड यांची आंदोलकांशी थेट चर्चेची भुमिका घेतल्यानंतर काल शुक्रवारी दुपारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आंदोलकांशी खुली चर्चा केली.

आ डॉ किरण लहामटे, अशोकराव भांगरे, विजयराव वाकचौरे, विनय सावंत, मिनानाथ पांडे, सुरेश खांडगे, भानुदास तिकांडे, चंद्रकांत सरोदे,डॉ संदीप कडलग, शांताराम गजे, सुरेश नवले, अमित नाईकवाडी आदी शिष्टमंडळात सहभाग होता. संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, नूतन अध्यक्ष इंजि सुनिल दातीर, सचिव सुधाकर देशमुख, कार्यकारीणी सदस्य यांचेशी दुपारी सुमारे दीड तास चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अगस्ती कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, माजी पं.स. सदस्य अरुण शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, नगरपंचायती चे सभापती शरद नवले, हितेश कुंभार, परशुराम शेळके, विजय पवार, शंभू नेहे, पुंजा पा आवारी आदी उपस्थित होते.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद चिघळणार; चर्चा निष्फळ
'श्रुती हसन'चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

आंदोलनकर्ते व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने परिसरात उपस्थित होते. सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संस्था पदाधिकारी व आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळात झालेल्या चर्चचा वृत्तांत लेखी स्वरूपात आंदोलकांना आंदोलन स्थळी जाऊन संस्था पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यावर प्रमुख आंदोलनकर्ते यांची बैठक होऊन धरणे आंदोलन मागे घेण्याचे कळविले जाईल असे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

समितीने यावेळी जे निवेदन दिले त्यावर यामध्ये मुद्दा टु मुद्दा चर्चा झाली. यामध्ये संस्थेचे सभासदत्व खुले करण्याचे पिचड यांनी मान्य करीत स्वतः पिचड, आ.डॉ. किरण लहामटे, डॉ. अजित नवले, अशोकराव भांगरे यांची समिती गठीत करण्याचाही निर्णय झाला. तसेच संस्थेच्या घटनेमध्ये योग्य ते बदल करण्याच्या दृष्टीने विविध शैक्षणिक संस्थांच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करुन सर्वसमावेशक बदल करण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची सल्लागार समिती गठीत करणे, संस्थेतील नोकरभरती, गैरव्यवहार याची त्रयस्थ व नि:पक्षपाती चौकशी करणेसाठी शासकीय समिती नियुक्त करावी यासाठीही मान्यता देण्यात आली. यापुढे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नियमीत होतील, संस्थेच्या सर्व शैक्षणिक विभागांचे लेखापरीक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. एस.सी. व एस.टी. तसेच एन.टी. आदींचा नोकरभरतीबाबतचा अनुशेष भरुन काढणार या व अशा एकूण १४ मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या ठिकाणी आंदोलकांनी या सर्व बाबी मान्य देखील केल्या. यानंतर हे सर्व निर्णय लेखी द्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केल्यावर याचीही पुर्तता तातडीने करण्यात आली. परंतु यानंतरही आंदोलकांनी हे आम्हाला मान्य नाही, गठित केलेल्या समितीत फेरबदल केले व इतर अनेक बाबी मान्य नसल्याचे सांगत सकारात्मक चर्चा करण्याऐवजी आठमुठेपणाची भूमिका घेऊन भडकावू भाषा सुरु केली. त्यांच्या नसानसात भरलेला व्यक्तीद्वेष उफाळून येत होता. त्यामुळे आता चर्चेची द्वारे त्यांनीच बंद केली आहे असे सांगतानाच संस्थेचे सचिव सुधाकर देशमुख यांनी आंदोलकांना संस्थेच्या हिताऐवजी व्यक्ती महत्वाच्या वाटतात, हे दुर्दैव असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद चिघळणार; चर्चा निष्फळ
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

दरम्यान माजी मंत्री पिचड यांनी आंदोलकानां सन्मान पूर्वक चर्चेला बोलावून वेळ दिला. मात्र त्यांच्यातील काही नेते मंडळींना आंदोलन मिटले पाहिजे असे मनोमन वाटत नव्हते. त्यामुळे सत्ताधारी भाजप, काँग्रेस, भा.क.प, शिवसेना यांचे कार्यकर्ते यांनी उद्या प्रति आंदोलना संदर्भात अकोलेत बैठकीचे आयोजन केले आहे. या धरणे आंदोलनाला जशास तसे प्रतिउत्तर देण्यासाठी तहसील कचेरी वर प्रति मोर्चा काढण्याचा निर्णय काल रात्री झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समजते.त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा वाद चिघळणार; चर्चा निष्फळ
गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

सीताराम गायकर यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कायम विश्वस्त पदाचा काल राजीनामा दिला. संस्थेचे नूतन उपाध्यक्ष विठ्ठल राव चासकर, सहसचिव बाळासाहेब भोर तसेच कार्यकारिणी सदस्य कचरू पाटील शेटे यांनी आपले पदाचा राजीनामा देत आंदोलनाला पाठींबा दर्शिविला आहे. ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी कालच आपल्या कार्यकारिणी सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे.

Related Stories

No stories found.