अ.ता. एज्यु सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने संस्थेच्या कार्यालयावर मोर्चा

अ.ता. एज्यु सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने संस्थेच्या कार्यालयावर मोर्चा

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकारी,कार्यकारिणी निवडी संदर्भात आज शिक्षण संस्था बचाव कृती समितीच्या वतीने संस्थेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसाठी विश्वस्तांसमवेत खुली चर्चा व्हावी अन्यथा 28 एप्रिल पासून संस्थेच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येतील असा इशारा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

यावेळी आमदार डॉ किरण लहामटे,आर पी आय राज्य सचिव विजय वाकचौरे,माकपचे नेते डॉ अजित नवले,संभाजी ब्रिगेडचे डॉ संदीप कडलग,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक बी जे देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे,तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, काँग्रेसचे नेते ऍड के बी हांडे,माजी पं.स. सदस्य चंद्रकांत सरोदे,राष्ट्रसेवा दलाचे विनय सावंत, दिलीप शेणकर, सुरेश नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुनील दातीर,उपाध्यक्ष विठ्ठलराव चासकर, सचिव सुधाकर देशमुख आदीनी मोर्चेकर्यांच्या निवेदन स्वीकारले. यावेळी उपाध्यक्ष चासकर यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे विश्वस्थांपर्यंत पोहचवू अशी ग्वाही दिली. डॉ. अजित नवले यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करून त्यात विविध मुद्दे उपस्थित केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com