अकोले तहसील कार्यालयावर उद्या पाणी हक्क मोर्चा

जोपर्यंत जलसेतूचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत निळवंडे कॅनॉलचे कोणतेही काम होऊ देणार नाही - डॉ. नवले
अकोले तहसील कार्यालयावर उद्या पाणी हक्क मोर्चा

अकोले |प्रतिनिधी| Akole

उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समिती (High Level Canal Water Rights Struggle Committee), अकोले (Akole), सर्व पक्षीय शेतकरी व कार्यकर्ते यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी (Demand) शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी, सकाळी 11 वाजता पाणी हक्क मोर्चाचे आयोजन (Organizing Water Rights Morcha) करण्यात आले आहे. हा मोर्चा राजकीय (Political) जोडे बाजूला ठेवून प्रशासकीय अधिकारी व ठेकेदाराच्या (Contractor) गलथान कारभाराच्या निषेधार्थ (Protest) काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये (Morcha) लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांनी हजारोंच्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी सामील व्हावे, असे आवाहन पाणी हक्क मोर्चा समितीच्या (Water Rights Morcha Committee) वतीने माकपचे यांनी केले.

अकोले शासकीय विश्रामगृहावर (Akole Government Rest House) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पासाहेब आवारी, अगस्ति पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब आवारी, धुमाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे, आंबड च्या सरपंच रेश्मा कानवडे, धामणगाव चे उपसरपंच गणेश पापळ, धामणगाव माजी सरपंच राधाकिसन पोखरकर, माजी सरपंच अशोकराव देशमुख, औरंगपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, रमेश आवारी, भाग्यश्री आवारी यासह अनेक लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

यावेळी डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) म्हणाले, जो पर्यंत जलसेतूचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लाभ क्षेत्रातील कोणतेही काम पूर्ण करून देणार नाही, यासाठी या कामातील प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) व ठेकेदाराचा (Contractor) खोडसाळपणा व गलथानपणामुळे उच्चस्तरीय कालवा पाणी हक्क संघर्ष समितीचा लढा हा शेवटपर्यंत आम्ही तेवत ठेवू. हा मोर्चा महात्मा फुले चौकातून (Mahatma Phule Chowk) थेट तहसील कार्यालयावर (Tahsil Office) येणार असून यावेळी प्रशासनाने याची दखल घ्यावी, आमचा हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्ष (Political Party) तथा सरकारच्या विरोधात नसून आमच्या हक्कासाठी हा लढा आहे. या लढ्यामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी आता सामील व्हावे असे आवाहन डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी केले.

शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ म्हणाले, निळवंडेच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांना याचा फायदा झाला पाहिजे. निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) उच्चस्तरीय कॅनॉलचे (Canol) पाणी संबंधित शेतकर्‍यांना मिळाले पाहिजे यासाठी या भागातील शेतकर्‍यांची ही लढाई आहे. कोणतेही सरकार विरोधात आमची लढाई नाही. राज्यात आमच्या पक्षाचे सरकार असले तरी तालुक्यातील लोकांच्या हक्क व न्यायासाठी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून यामध्ये सामील होणार असल्याचे सांगितले.

निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला, तरी अजून अकोले (Akole) तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचे पाणी अद्याप मिळालेले नाही. अनेक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. तालुका अजूनही दुष्काळाच्या (Drought) झळा सोसत आहे.

उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम दोन तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. केवळ नदी पात्रातील (River) जलसेतूचे काम जाणीवपूर्वक अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्यामुळे या उजव्या उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी (Canal Water) सोडता आलेले नाही. अकोले (Akole) तालुक्यातून इतर तालुक्यांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी निम्नस्तरीय कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. अत्यंत कठीण डोंगर फोडून व रस्त्यांवर पूल बांधून, ओढे नाले ओलांडत ही निम्नस्तरीय कालव्यांची कामे अति जलद गतीने पूर्ण केली जात आहेत. उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जल सेतुचे काम मात्र हेतुतः वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवले जात आहे. उजव्या व डाव्या कालव्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत. सिंचन क्षेत्र विस्तारण्यासाठी दिलेले पुरवणी प्रस्तावही प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांच्या मनात याबाबत मोठा असंतोष खदखदतो आहे.

या मागण्यांसाठी निघणार मोर्चा :-

- उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे.

- उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी

- डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून ही कामे तातडीने पूर्ण करावी.

- भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com