अकोलेतील सुरभी बारला ठोकले टाळे

विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची कारवाई
अकोलेतील सुरभी बारला ठोकले टाळे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले सुरभी बारचे मालक सुरेश कालडा हे संगमनेर मध्ये पकडण्यात आलेल्या बनावट दारूतील प्रमुख आरोपी असुन, त्यांनी अकोल्यात गत 5 वर्षापासुन बनावट दारूची विक्री केली असल्याचा आरोप करत सुरभी बार बंद करण्यात यावे व कालडा यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज मंगळवारी शिवसेना,भाजप,आर पी आय यांचे सह अन्य राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनाने वेळीच दखल घेत येथील सुरभी बारला टाळे ठोकले.

संगमनेर येथील रायतेवाडी मध्ये दि.15 आँगस्ट रोजी बनावट दारू साठा आढळल्या प्रकरणातील आरोपी सुरेश मनोज कालडा हे अकोलेतील सुरभी बारशी संबंधीत असल्याने दारु उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकुन दारू विक्रेत्याने(ब्रिज केस) नियमभंग केल्या प्रकरणी शिवकुमार मनोज कालडा यास अटक करुन सुरभी बारवर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिका-याकडे पाठवला होता. तरीही सुरभी बार सुरु असल्याने हे सुरभि परमिट रुम बंद करा आणि पाठिशी घालणार्या प्रशासनाचा निषेध असो, बनावट दारू बंद करुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोर्चा नेऊन ठिय्या आदोलन केले.

तर बनावट दारु विकली जावून राजरोसपणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत सुरेश कालडा यांचे मालकीचे अकोल्यातील सुरभी बार सर्रासपणे चालू आहे. तेथे अजूनही बनावट दारु विक्री होत आहे. सदरची बनावट दारु असंख्य सामान्य जनतेचा बळी घेत असल्याचे निवेदन तहसीलदार सतिश थेटे यांना दिले.व सुरभी बार फोडण्याचा इशारा देत आक्रमक भूमिका आदोलकानी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.त्यामुळे तहसीलदारांच्या दालनात तहसीलदार सतीश थेटे आणि स.पो.नि.मिथुन घुगे यांनी तात्काळ बैठक घेऊन जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने सुरभि परमिट दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.

या मोर्चामध्ये सेनेचे तालुका प्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ, उपजिल्हा प्रमुख रामहरी तिकांडे, अगस्ति कारखान्याचे संचालक,सेना नेते महेशराव नवले, प्रदिप हासे,शहर प्रमुख नितीन नाईकवाडी,कार्याध्यक्ष गणेश कानवडे,भाजपचे मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे,राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे अनिल कोळपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष नाईकवाडी, डॉ. रामहरी चौधरी, आर पी आयचे अध्यक्ष शांताराम संगारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले, काँग्रेसचे बाबासाहेब नाईकवाडी, सेनेचे नगरसेवक नवनाथ शेटे, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब गोर्डे, सुदेश मुतडक, बाळासाहेब देशमुख, संजय साबळे, दत्तू मंडलिक, दत्ता ताजणे, श्रीराम गुंजाळ, वैभव सावंत, सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य, अ‍ॅड. राम भांगरे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अकोले शहर व तालुक्यातील जुगार, मटका, गांजा, बनावट ताडी व अन्य अवैध व्यवसाय देखील बंद करून संबंधित चालकांना तडीपार करण्याच्या कारवाईबाबत प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी. अन्यथा 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ व सेना नेते महेशराव नवले यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com