अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या सरपंच- उपसरपंच निवडी काल शांततेत पार पडल्या. बहुतेक ठिकाणी तडजोडीचे वातावरण दिसून आले.

गाव पातळीवर काम करणारे काही युवक सरपंचपदी विराजमान झाले आणि काहींना आशा लावली तेथे सदस्यांनी ठेंगा दाखवल्याने सरपंचपदाचा मान इतरांना मिळाला. या धामधुमीत सरपंचपद सहा ठिकाणी रिक्त राहिले तर घोडसरवाडी येथील निवडणुकीवर बहिष्कार राहिल्याने तेथील सरपंच- उपसरपंचपद हे रिक्तच राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी रुंभोडीचे सरपंचपद हस्तगत केले तर देवठाण येथे केशव अर्जुन बोडके या भाजपच्या कार्यकर्त्याला पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांनी सरपंचपद बहाल केले. धुमाळवाडी येथे डॉक्टर रवींद्र गोर्डे तर मेहेंदुरी येथे अमित येवले या युवकाला तर म्हाळादेवी येथे सौ. कविता प्रदीप हासे यांना उपसरपंचपद मिळाले.

गावानुसार सरपंच व उपसरपंच या क्रमाने पुढील निवडी पार पडल्या. कळस बु- सरपंच संतोष उर्फ राजेंद्र गवांदे, उपसरपंच - ज्ञानेश्वर वाकचौरे. सुगाव खुर्द- सरपंच- शुभांगी संजय वैद्य. उपसरपंच - डॉ. धनजय वैद्य. मनोहरपूर - सरपंच- पदमा केशव भांगरे. उपसरपंच- अर्चना अमोल भांगरे. रुंभोडी - सरपंच- रवी मालुंजकर, उपसरपंच - इंदिरा मालुंजकर. उंचखडक खुर्द- सरपंच - भास्कर शिवाजी पवार, उपसरपंच- डॉ.मनोज सखाहारी मोरे. ब्राह्मणवाडा सरपंच- संतोष भांगर, उपसरपंच - सुभाष गायकर. जांभळे - सरपंच -रिक्त. उपसरपंच- सुदाम खरात. बहिरवाडी- सरपंच गोरख पाडेकर, उपसरपंच- डॉ. सतीश चासकर. बेलापूर - सरपंच- ज्योती म्हसु जगताप, उपसरपंच- राजाराम कान्हू फापाळे. नवलेवाडी -प्रा. विकास भिकाजी नवले, उपसरपंच - मिनाक्षी अशोक वाकचौरे. मेहेंदुरी - अमित भाऊसाहेब येवले, उपसरपंच - मंजेरी सागर आरोटे. विरगाव-सरपंच प्रगती रावसाहेब वाकचौरे उपसरपंच - जयवंत सीताराम थोरात. कुंभेफळ-सरपंचपद रिक्त, उपसरपंच प्रिया प्रशांत पवार. वाशेरे - सरपंच पद रिक्त, उपसरपंच- अनिता किरण गजे. हिवरगाव - सरपंच शांताराम देवराम बेंगाळ, उपसरपंच संग्राम सर्जेराव आंबरे. पिंपळगाव खांड-सरपंचपद रिक्त, उपसरपंच अलका सुभाष शेटे. पांगरी - सरपंच रामदास दामू खांडवे, उपसरपंच संदीप रंगनाथ डोंगरे.टाकळी- सरपंच शीतल सागर तिकांडे, उपसरपंच दत्तू गरुड. कोतूळ -सरपंच भास्कर गोविंद लोहकरे, उपसरपंच - संजय पांडुरंग देशमुख. म्हाळादेवी -सरपंच मारुती बुधा मेंगाळ, उपसरपंच- कविता प्रदीप हासे. निंब्रळ - सरपंच उल्हास माधव पथवे, उपसरपंच उज्वला शिवाजी पथवे. मन्याळे - सरपंच विठ्ठल कुराडे, उपसरपंच - अशोक रामचंद्र ढोके. इंदोरी सरपंचपद रिक्त, उपसरपंच - वैभव बाळासाहेब नवले. घोडसरवाडी -दोन्ही पदे रिक्त. ढोकरी -सरपंच बेबी दत्तात्रय शेटे, उपसरपंच-किसन रेवजी शेटे. लिंगदेव -सरपंच अनिल घोमल, उपसरपंच -राजूबाई गंगाराम फापाळे. धुमाळवाडी-सरपंच डॉ. रवींद्र जयवंत गोरडे, उपसरपंच-आशा शिवाजी धुमाळ. गणोरे- सरपंच संतोष सुभाष आंबरे, उपसरपंच- प्रदीप रावसाहेब भालेराव. कळस खुर्द - सरपंच -सुलोचना मोहन झोडगे, उपसरपंच -रावसाहेब सोमा मेंगाळ. देवठाण - सरपंच केशव अर्जुन बोडके, उपसरपंच-आनंदा किसनगिरी गिर्हे.

अनेक ठिकाणी कुरघोडी झाल्या. काही ठिकाणी वातावरण तप्त झाले. पोलीस प्रशासनाने काही संवेदनशील गावात चोख बंदोबस्त बजावला.