अकोले : राजूर ग्रामपंचायत निवडणूकीत गड गेला पण सिंह आला

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली होती पणाला
अकोले : राजूर ग्रामपंचायत निवडणूकीत गड गेला पण सिंह आला

अकोले | प्रतिनिधी

राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेल्या राजूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. गड आला पण सिंह गेला अशी स्थिती भाजपची झाली आहे. भाजपने चुरशीच्या निवडणूकीत ग्रामपंचायतमध्ये बहुमत मिळविले मात्र सरपंच पदाच्या निवडणूकीत निसटत्या पराभवास त्यांना सामोरे जावे लागले. सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजपला 11 तर महाविकास आघाडी ला 6 जागांवर समाधान मानावे लागले.

अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या राजूर ग्रामपंचायतचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती स्री राखीव जागेसाठी राखीव होते. पहिल्या पासूनच ही निवडणूक आजी- माजी आमदारांनी अतिशय अतिशय प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सौ.पुष्पा निगळे यांनी भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील सौ. शोभा देशमुख यांचा 19 मतांनी पराभव केला.

सरपंच पदासाठी फेरमतमोजनी करण्यात आली पण निकालात बदल झाला नाही. नूतन सरपंच पुष्पा निगळे यांनी भाजपकडेही उमेदवारी मागितली होती पण उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्या राष्ट्रवादी कडून उभ्या राहिल्या व विजयी झाल्या. या निवडणुकीत भाजपचे माजी सरपंच गणपत देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे व संतोष बनसोडे यांचा विजय झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-

वार्ड क्र.1

प्रमोद देशमुख महाविकास

अतुल पवार भाजप

संगीता मैड भाजप

वार्ड क्र.2

ओंकार नवाळी. महाविकास

संगिता मोहंडुळे महाविकास

संगीता जाधव. महाविकास

वार्ड क्र.3

रामा मुतडक. महाविकास

रोहिणी देशमुख. . भाजप

वार्ड क्र.4-

गोकुळ कानकाटे. भाजप

सुप्रिया डगळे. भाजप

सारिका वालझाडे भाजप

वार्ड क्र.5-

राम बांगर- भाजप

विमल भांगरे-भाजप

रोहिणी माळवे - महाविकास

वार्ड क्र.6-

गणपत देशमुख - भाजप

संतोष बनसोडे- भाजप

लता सोनवणे- भाजप

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com