
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत केवळ सहाच हरकती आल्या आहेत. यात अकोले तालुक्यातून चार तर राहुरी तालुक्यातील दोन हरकतींचा समावेश आहे. हरकती दाखल करण्यासाठी आता मंगळवार आणि बुधवार असे दोनच दिवस शिल्लक आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या 85 गट आणि 170 गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. या प्रारूप प्रभाग रचेनवर सोमवारी चार हरकती दाखल झालेल्या आहेत. यात राहुरी तालुक्यातील बाभुळगाव गावातील दोघांनी दोन हरकत घेत पूर्वी आमचे गाव वांबोरी गटात होते. आता ते बारागाव नांदूर गटात टाकण्यात आले असून पूर्वी नूसार बाभुळगाव हे गाव वांबोरी गटात ठेवण्याची मागणी हरकतीनूसार घेण्यात आली आहे.
तर अकोले तालुक्यातील उंचखडक, मुथाळणे या गावातून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली असून या गावांनी देखील आताच्या नवीन गटाऐवजी पूर्वीच्या गटात आमचे गाव ठेवण्याची तर कळस खु गावातून दोन हरकती आल्या असून त्यांची मागणी देखील आताएवेजी पूर्वीच्या गट त्यांचे गाव ठेवण्याची मागणी केली आहे.
दाखल हरकतींवर येत्या 9 तारखेला सकाळी 11 वाजता विभागयी आयुक्त यांच्या समोर सुनावणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.