अकोले : दुध दरवाढीसाठी कोतुळ व आंबड़ येथे दूध उत्पादकांची निदर्शने

दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध
अकोले : दुध दरवाढीसाठी कोतुळ व आंबड़ येथे दूध उत्पादकांची निदर्शने

अकोले (प्रतिनिधी) - दुध दर प्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आज कोतुळ व आंबड़ या ठिकाणी दूध संकलन केंद्रांवर परिसरातील दूध उत्पादकांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला.

दुधाला किमान 35 रुपये हमीभाव मिळावा,साखर उदयोगा प्रमाणे दूध क्षेत्रालाही आधार भावाच्या संरक्षणासाठी दुधाला एफआरपी व उत्पन्न वाटयासाठी रेव्हन्यू धोरण दूध व्यवसायिकांना लागू करावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

अकोले तहसील कार्यालयात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे एकनाथ मेंगाळ, सुरेश भोर, सचिन गीते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com