अखेर चिमुकल्यांपर्यंत पोहोचला पाण्याचा झरा

अखेर चिमुकल्यांपर्यंत पोहोचला पाण्याचा झरा

अकोले (प्रतिनिधी):

अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने सावरचोळ येथील आश्रमशाळेतील चिमुकल्यांच्या पाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

पिंपळगाव खांड धरणातून आश्रम शाळेपर्यंतची पाणी योजना अखेर ७ जानेवारीला कार्यान्वित झाली. या शाळेला जाणवणारी पाणीटंचाई आता दूर होणार आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूरचे प्रकल्पाधिकारी राजेंद्र भवारी यांच्या हस्ते पाण्याच्या पाईप लाईनचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.

अखेर चिमुकल्यांपर्यंत पोहोचला पाण्याचा झरा
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. एस. पवार, एन. एल. झरेकर, विजय जगताप, ब्राह्मणे पिंपळगाव खांडचे उपसरपंच संतोष शेटे, व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सावरचोळ येथील सर्व वर्ग-३ व वर्ग ४ चे काम कर्मचारी उपस्थित होते. पिंपळगाव खांड येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने योजना सुरू झाली.

जून २००४ मध्ये सावरचोळ गावातील भाड्याच्या इमारतीत शासकीय आश्रमशाळा सावरचोळ सुरू करण्यात आली. हळूहळू शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला व शिक्षकांच्या अथक परिश्रमातून व गावकऱ्यांच्या सहकार्याने ऑगस्ट २०१६ मध्ये शाळेची भव्य इमारत साकारली गेली. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची व निवासाची उत्तम सोय झाली पण आता शाळेपुढे प्रश्न होता तो पिण्याच्या पाण्याचा.

अखेर चिमुकल्यांपर्यंत पोहोचला पाण्याचा झरा
Sagarika Ghatge Birthday: राजघराण्यातली मुलगी, अभिनेत्री म्हणून करिअर, शाहरुखसोबत ब्लॉकबस्टर हिट!

सन २०१७- १८ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र कामात येणाऱ्या सततच्या अडथळ्यामुळे हे काम पूर्णत्वास जात नव्हते. सन २०१८ ते २०२० पर्यंत हे काम बंद पडले. मुलांच्या पाण्याचा प्रश्न भागविण्यासाठी शाळेने बोअरवेल घेतला पण त्या प्रयत्नाला यश आले नाही. अखेर जानेवारी २०२२ मध्ये मुलांसाठी पाण्याच्या पाइपलाईनच्या कामाला यश आले.

अखेर चिमुकल्यांपर्यंत पोहोचला पाण्याचा झरा
“घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात...”; पडद्यावर 'सिंधुताई' साकारणाऱ्या तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com