अकोलेत ‘कही खुशी कही गम’

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण घोषित
अकोले पंचायत समिती
अकोले पंचायत समिती

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जागांचे आरक्षण जाहिर झाले असुन अकोले तालुक्यातील अनेक इच्छूक उमेदवारांची निराशा झाली असुन तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते व सर्व पक्षीय मंडळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अकोले पंचायत समिती
संगमनेर : पंचायत समिती निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर

आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आरक्षण जाहीर केले आहे. यावेळी अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष याकडे लागून होते. अकोले तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण अहमदनगर येथे काढण्यात आले. ते पुढीलप्रमाणे -

अकोले पंचायत समिती
राहुरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

1) धुमाळवाडी गट - अनुसूचीत जमाती

2) राजुर गट - ओबीसी

3) पाडाळणे गट - ओबीसी

4) देवठाण गट - सर्वसाधारण महिला

5) कोतुळ गट - सर्वसाधारण महिला

6) समशेरपुर गट - सर्वसाधारण व्यक्ती

अकोले पंचायत समिती
श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण

अकोले पंचायत समिती येथे पंचायत समितीच्या 12 जगाच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी समन्वय अधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे व तहसीलदार सतिश थेटे उपस्थित होते.

अकोले पंचायत समिती
नेवासा तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

पंचायत समितीचे आरक्षण पुढील प्रमाणे -

1) समशेरपुर गण - सर्वसाधारण

2) खिरविरे गण - सर्वसाधारण

3) देवठाण गण - अनुसूचीत जमाती महिला

4) गणोरे गण - अनुसूचीत जमाती महिला

5) धुमाळवाडी गण - अनुसूचीत जमाती

6) धामणगाव आवारी - अनुसूचीत जमाती महिला

7) राजुर गण - अनुसूचीत जाती

8) वारंघुशी गण - सर्वसाधारण महिला

9) पाडाळणे गण - सर्वसाधारण महिला

10) शेलद गण - सर्वसाधारण महिला

11) कोतुळ गण - अनुसूचीत जमाती

12) ब्राम्हणवाडा गण - अनुसूचित जमाती

या सोडतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com