अकोले नगरपंचायत निवडणूक काँग्रेस आय पक्ष स्वबळावर लढविणार - वाकचौरे

अकोले नगरपंचायत निवडणूक काँग्रेस आय पक्ष स्वबळावर लढविणार - वाकचौरे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस आय पक्ष सर्वच्या सर्व 17 प्रभागांत उमेदवार देवून

स्वबळावर ही निवडणूक लढविणार आहे. नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात येईल असा दावा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांनी केला .

काँग्रेस आय पक्षाचे शहरातील कार्यकर्त्याची बैठक काल जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, जिल्हा सेक्रेटरी शिवाजीराव नेहे, जिल्हा सहसचिव आरीफ तांबोळी, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शब्बीरभाई शेख, मागासवर्गीय सेल ता.अध्यक्ष किशोर रुपवते, काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष अनिल शेटे, विधी सेल अध्यक्ष रमेश जोरवर,

युवक काँग्रेसचे अमोल नाईकवाडी, बाबासाहेब नाईकवाडी, संतोष नाईकवाडी, विधीसेल तालुकाध्यक्ष ड.बी.एम.नवले. उपाध्यक्ष ड. के. बी. हांडे, व्यापारी सेल तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी, सरचिटणीस संपतराव कानवडे, बी.डी.देशमुख, सलीम शेख, गणेश गुरुकुले, सौ.कांचन रुपवते, सौ.अरूणा गायकवाड, डॅाक्टर सेल अध्यक्ष डॅा.नितिन बिबवे, डॅा.सुधीर कोटकर, संतोष तिकांडे ,सेवादल तालुकाध्यक्ष कैलासराव वाकचौरे आदि उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकित नगरपंचायत निवडणूक व नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीबाबत चर्चा होऊन काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली अकोले नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी सर्व 17 प्रभागांत उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांनी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यानी नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी करावी.अशी सूचना करून राज्याचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जे कोणी कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छितात त्याचे स्वागत केले जाईल. व येणारी नगरपंचायत निवडणूक ही काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवून नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com