अकोले नगरपंचायतचे 21 डिसेंबरला मतदान, 22 ला मतमोजणी

गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची धावपळ
अकोले नगरपंचायतचे 21 डिसेंबरला मतदान, 22 ला मतमोजणी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन यानुसार मंगळवार दि 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असुन बुधवार दि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच आज बुधवारपासून निवडणूक आचारसंहिता लागली आहे. आज जाहिर कार्यक्रमामुळे इच्छुकांची मात्र धावपळ सुरु झाली आहे.

अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपून वर्षभरा पेक्षा अधिक काळ झालेला आहे मागील वर्षीच निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र कोविडच्या संकटकाळामुळे शासनाने सर्व निवडणुक कार्यक्रम रद्द करुन प्रशासक काळ नगरपंचायतीमध्ये सुरु होता. आत राज्यासह जिल्ह्यात कोविड संक्रमण ओसरले असल्याने आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 व डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणार्‍या नगरपंचायतीच्या सदस्य पदाची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला असुन या कार्यक्रमानुसार 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्यात येतील.

तसेच मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करतील यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निच्छित केलेल्या वेबसाईड वर बुधवार दि 1 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते मंगळवार दि 07 डिसेंबर 2021. दुपारी 2 .00 वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी वेबसाईडवर उपलब्ध राहतील. नामनिर्देश पत्र (उमेदवारी अर्ज) बुधवार 1 डिसेंबर 2021 ते मंगळवार दि 7 डिसेंबर 2021 रोजी 11 ते 3 वाजेपर्यत स्वीकारण्यात येतील. यामध्ये शनिवार 4 डिसेंबर व रविवार 5 डिसेंबर रोजी सुट्टी आसल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 नंतर नामनिर्देश पत्राची (उमेदवारी अर्जाची) छाननी होऊन वैधरित्या नामनिर्देश झालेल्या उमेदवार अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देश पत्र (उमेदवारी अर्ज) 13 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत माघारी घेण्याची मुदत आहे 14 डिसेंबर2021 रोजी चिन्ह वाटप करण्यात येतील. या सर्व प्रक्रियेत अपिल. करण्यासाठी 16 डिसेंबर 2021 पर्यत मुदत आहे.

प्रत्यक्ष निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यत होईल.व निवडणुकीनंतर लगेच दुस-या दिवशी 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु होऊन निकाल जाहिर करण्यात येईल असा एकुण नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम आहे.

अकोले नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने इच्छुकांसह राजकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.अनेकांच्या मतानुसार निवडणूक जानेवारी, फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्याता होती मात्र निवडणूक आयोगाने डिसेंबरमध्येच निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याने आता इच्छुकांची ताराबंळ उडणार असून या निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम उमेदवारी करणार्‍या उमेदवारास प्रचारासाठी अवघ्या सात दिवसांचा वेळ मिळणार आहे.

अकोले तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात गेल्या दोन वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.राजकिय अस्थिरता व प्रत्येक राजकिय पक्षातील गटबाजी,प्रत्येक प्रभागातील इच्छुकांची वाढती संख्या डोकेदुखी ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com