अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 टक्के मतदान

अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 टक्के मतदान

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगर पंचायत निवडणुकीसाठी अकोल्यात काल 80.69 टक्के पेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून आले. शहरा पेक्षा शहरा लगतच्या ग्रामीण परिसरात मतदारांत अधिक उत्साह दिसून आला.प्रभाग क्रमांक 8 (शेकईवाडी) मध्ये सर्वाधिक म्हणजे 80 टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वात कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 टक्के मतदान
पारनेर नगरपंचायत : 13 जागांसाठी झाले ‘एवढे’ टक्के मतदान

नगर पंचायतीच्या 13 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेना युती यांच्यात असली तरी काँग्रेसमुळे अनेक प्रभागांत चुरशीच्या तिरंगी लढती पहायला मिळाल्या. एकूण 10 हजार 194 मतदारांपैकी 8 हजार 226 म्हणजे 80.69 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 टक्के मतदान
कर्जत नगरपंचायतीसाठी 80.21 टक्के मतदान

सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 13 प्रभागांसाठी 19 मतदान केंद्रे होती. शहरांपेक्षा शहरालगतच्या ग्रामीण परिसरात मतदानाचा उत्साह अधिक होता. पहिल्या चार तासांतच पानसरवाडी येथील प्रभाग 17 मध्ये 52 टक्के मतदान झाले होते. या चार तासांत एकूण सरासरी 30.94 टक्के मतदारांनी मतदान हक्क बजावला. दुपारनंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला. साडेतीन वाजेपर्यंत 68.21 टक्के मतदान झाले. या वेळेपर्यंतच काही केंद्रांवर 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदले गेले होते.प्रभाग 8 मध्ये सर्वाधिक तर प्रभाग 3 मध्ये सर्वात कमी मतदान झाले.

प्रभागनिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. प्रभाग 1-88.58, प्रभाग- 2,86.33, प्रभाग 3-69.78, प्रभाग 5- 76.52, प्रभाग 6 ,73.66, प्रभाग 7-77.38, प्रभाग 8-88.10, प्रभाग 9-76.52, प्रभाग 10- 91.49, प्रभाग 12- 83.34, प्रभाग 15- 81.21, प्रभाग 16- 83.66, प्रभाग 17 -89.74

माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 12 जागा लढविल्या आहेत. पिचड यांनी कार्यकर्त्यांसह सर्व मतदार केंद्रांना भेटी दिल्या. तर राष्ट्रवादी तर्फे आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक, ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जि. प. सदस्या सुनीता भांगरे मतदान काळात अकोलेत तळ ठोकून होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्या प्रभागात उमेदवार दिले त्या प्रभागात भेटी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com