अकोले नगरपंचायत निवडणूक, उर्वरीत 4 प्रभागांत 13 उमेदवार रिंगणात

दोघांची माघार || प्रभाग 4 मध्ये चौरंगी तर इतर 3 प्रभागांत तिरंगी लढत
अकोले नगरपंचायत निवडणूक, उर्वरीत 4 प्रभागांत 13 उमेदवार रिंगणात

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतीच्या उर्वरित 4 प्रभागांतील निवडणुकीत काल सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 2 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर प्रभाग क्र. 4 मधील अपक्ष उमेदवार योगेश मुकुंद जोशी यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने येथे चौरंगी लढत होत आहे तर इतर 11, 13 व 14 प्रभागांत भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. आता एकूण 4 प्रभागांत 13 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

अकोले नगरपंचायतच्या 4 प्रभागांतील निवडणुकीच्या दाखल 22 उमेदवारी अर्जाची छाननी होऊन त्यामध्ये 5 अर्ज अवैध ठरून 17 अर्ज वैधरित्या प्राप्त झाले होते. यामध्ये पक्षाच्या उमेदवारांचे अपक्ष राहिलेले अर्ज मागे झाल्यानंतर माघारीच्या शेवट दिवशी प्रभाग क्र. 4 मधील अपक्ष उमेदवार दत्तात्रय चिमाजी भोईर व प्रभाग क्र. 14 तील अपक्ष उमेदवार प्रकाश शंकर नाईकवाडी यांनी माघार घेतली असल्याने 4 प्रभागांत एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

यावेळी शहरातील प्रमुख गावठाणातील प्रभाग क्र. 4 मधून अपक्ष म्हणून योगेश मुकुंद जोशी यांनी माघार न घेतल्याने या प्रभागात भाजपाचे हितेश रामकृष्ण कुंभार, शिवसेनेचे मैड श्रीकांत सुधाकर, व काँग्रेसचे तांबोळी फैजान शमसुद्दीन अशी चौरंगी लढत होत आहे तर प्रभाग क्र. 11 मधून 1) वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भारतीय जनता पार्टी), 2) वंदना भागवत शेटे (राष्ट्रवादी काँग्रेस), 3) वनिता रामदास शेटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रभाग क्र. 13 मधून 1) मोहिते जनाबाई नवनाथ (भारतीय जनता पार्टी), 2) लोखंडे आरती सुरेश (राष्ट्रवादी काँग्रेस), 3) कर्णिक अंजली स्वप्निल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रभाग क्र. 14 मधून 1) नवले शरद एकनाथ (भारतीय जनता पार्टी), 2) नाईकवाडी राजेंद्र यादव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 3) डमाळे पांडुरंग बाबुराव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) अशी तिरंगी लढत होत आहे.

एकूणच मागील 13 वार्डातील निवडणुकीनंतर उर्वरित या चार वार्डातील निवडणुकीचीही रणधुमाळी सुरू झाली आहे. या सर्व वॉर्डात राष्ट्रवादी-सेना आघाडी, भाजपा व काँग्रेस असे तीनही पक्षाचे एकमेकासमोर आव्हान आहे तर 4 नंबर वार्डात एक अपक्ष म्हणून योगेश जोशी निवडणूक लढवत असून त्यांची उमेदवारी ही 4 प्रभागातील प्रबळ दावेदारी म्हटली जात असून या वार्डात सर्वांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. असे असले तरी मुस्लीम समाजाचे मतदान येथे जास्त असून जोशी व तांबोळी यांच्या उमेदवारीचा तोटा कोणाला होणार हे 19 जानेवारीला समजेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com