अकोले नगरपंचायत निवडणुकीत अनेक प्रभागांत बहुरंगी लढती

अकोले नगरपंचायत निवडणुकीत 
अनेक प्रभागांत बहुरंगी लढती

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी 44 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले असून काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढत आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती असली तरी या दोन्हीही पक्षांचे अनेक बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे बहुसंख्य प्रभागांत तिरंगी, चौरंगी लढती होणार आहेत.

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना काल मंगळवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले व त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.

ओबीसी आरक्षणाचे चार प्रभाग वगळून नगरपंचायत निवडणूक लढवीत असलेले प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र 1- मंडलिक अलका अशोक (काँग्रेस), मंडलिक विमल संतु (शिवसेना), मंडलिक सुरेखा पुंजा (राष्ट्रवादी). प्रभाग क्र 2- चौधरी शिवाजी आनंदा (राष्ट्रवादी), चौधरी सागर निवृत्ती(भाजप), चौधरी सागर विनायक(काँग्रेस). प्रभाग 3- नवले जयश्री दत्तात्रय-(मनसे), पांडे मंदा तान्हाजी (राष्ट्रवादी), मनकर प्रतिभा वसंत (भाजप), शिंदे ठकूबाई पोपट(शिवसेना). प्रभाग 5 -कानवडे गणेश भागुजी (शिवसेना), गुजर हर्षल रमेश (मनसे), नाईकवाडी सोनाली लक्ष्मीकांत(भाजप). प्रभाग 6 - घोडके शैला विश्वनाथ (भाजप), रुपवते कांचन किशोर(काँग्रेस), रुपवते श्वेताली मिलिंद (राष्ट्रवादी). प्रभाग 7- ताजणे सचिन सदाशिव(माकप), शेख आरीफ शमसुद्दीन (राष्ट्रवादी), शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजप). प्रभाग 8- गायकवाड अशोक दत्तू ( राष्ट्रवादी), गायकवाड जयराम विठोबा-(शिवसेना), गायकवाड योगेश उर्फ शिवाजी ( मनसे), वडजे बाळासाहेब काशिनाथ (भाजप). प्रभाग 9- रोकडे भिमा बबन (राष्ट्रवादी), वैद्य शितल अमोल उर्फ बिबवे शितल मधुकर (भाजप). प्रभाग 10- नाईकवाडी अनिल गंगाधर (भाजप), नाईकवाडी प्रकाश संपतराव(अपक्ष), शेटे नवनाथ विठ्ठल (शिवसेना), शेटे मयूर नामदेव (काँग्रेस), शेणकर संदीप भाऊसाहेब(राष्ट्रवादी). प्रभाग 12- कुरेशी निलोफर गफ्फार (राष्ट्रवादी), जाधव सुमन सुरेश (काँग्रेस), पवार अनिता शरद(शिवसेना), शेख तमन्ना मोसिन (भाजप). प्रभाग क्र 15-नाईकवाडी प्रदीप बाळासाहेब(काँग्रेस), नाईकवाडी संतोष कारभारी (राष्ट्रवादी), वर्पे अजय भीमराज-(शिवसेना), शेटे सचिन संदीप(भाजप). प्रभाग क्र 16-भांगरे पुष्पा शरद(शिवसेना), भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी), भांगरे मीना प्रकाश (काँग्रेस), शेणकर माधुरी रवींद्र,(भाजप). प्रभाग क्र 17-पानसरे आशा रवींद्र (राष्ट्रवादी), शेळके कविता परशुराम (भाजप).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com