अकोले नगर पंचायतीसाठी 5 अर्ज अवैध

4 जागांसाठी आता 17 उमेदवारी अर्ज वैध
अकोले नगर पंचायतीसाठी 5 अर्ज अवैध

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतच्या 4 प्रभागांतील निवडणुकीच्या दाखल 22 उमेदवारी अर्जाची मंगळवारी छाननी होऊन त्यामध्ये 5 अर्ज अवैध ठरले आहेत.त्यामुळे 4 जागांसाठी 17 अर्ज वैध ठरले आहेत.

नगरपंचायतच्या प्रभाग क्र 4 मध्ये पंचरंगी तर प्रभाग 14 मध्ये चौरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीची शेवटची मुदत 10 जानेवारी आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अकोले नगरपंचायत निवडणुकितील राहिलेल्या 4 प्रभागांत येत्या 18 जानेवारी रोजी मतदान होत असून एकूण दाखल असलेल्या 22 अर्जांची आज छाननी होऊन 5 अर्ज अवैध ठरले तर 17 अर्ज वैध ठरले आहेत. पूर्वीच्या 13 जागेचा निकालही अजून जाहीर नसल्याने सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत असल्याने या 4 प्रभागांतील निवडणूक ही भाजपा विरुध्द राष्ट्रवादी-सेना आघाडी विरुध्द काँग्रेस अशी तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चारही प्रभागांत राष्ट्रवादी सेना आघाडीचे आ. डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते सीताराम पा.गायकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ हे तर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार वैभवराव पिचड, भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी व नेते आपली ताकद अजमावत आहेत.

प्रभाग निहाय वैध व अवैध ठरलेले अर्ज संख्या पुढीलप्रमाणे 1) प्रभाग क्रमांक- 4 -एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रे-7, वैध-6, 2) प्रभाग क्रमांक- 11-एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रे-4- वैध-4, 3) प्रभाग क्रमांक 13-एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रे-6-वैध-3, 4) प्रभाग क्रमांक 14-एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रे-5-वैध-4-एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रे-22, वैध-17 अवैध-5

यानुसार वैध ठरलेले उमेदवाराचे नावे प्रभागनिहाय पुढीलप्रमाणे-

प्रभाग क्र. 4 मधून 1) तांबोळी फैजान शमसुद्दीन (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 2) कुंभार हितेष रामकृष्ण (भारतीय जनता पार्टी), 3) मैड श्रीकांत सुधाकर (शिवसेना), 4) योगेश मुकुंद जोशी (अपक्ष), 5) दत्तात्रय चिमाजी भोईर (अपक्ष),

प्रभाग क्र. 11 मधून 1) वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भारतीय जनता पार्टी), 2) वंदना भागवत शेटे (राष्ट्रवादी काँग्रेस), 3) वनिता रामदास शेटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रभाग क्र. 13 मधून 1) मोहिते जनाबाई नवनाथ (भारतीय जनता पार्टी), 2) लोखंडे आरती सुरेश (राष्ट्रवादी काँग्रेस), 3) कर्णिक अंजली स्वप्निल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस).

प्रभाग क्र. 14 मधून 1) नाईकवाडी प्रकाश शंकर (अपक्ष), 2) नवले शरद एकनाथ (भारतीय जनता पार्टी), 3) नाईकवाडी राजेंद्र यादव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 4) डमाळे पांडुरंग बाबुराव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).

Related Stories

No stories found.