अकोल्याच्या दुर्गम भागात एमएस-सीईटीच्या विद्यार्थ्यांची सोय करा

परीक्षा कालावधीत विशेष बसची व्यवस्था करण्याची आपची मागणी
अकोल्याच्या दुर्गम भागात एमएस-सीईटीच्या विद्यार्थ्यांची सोय करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एमएस-सिईटी परीक्षेचा नंबर अकोला तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या महाविद्यालयात आलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने परीक्षा कालावधीत शहरातून जादा बसेसची व्यवस्था करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने तारकपूर डेपोचे आगार व्यवस्थापक एस. एम. आघाव यांना देऊन चर्चा केली. त्यावर आघाव यांनी एमएस-सिईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, शहर कार्याध्यक्ष भरत खाकाळ, संघटक प्रा. अशोक डोंगरे, मनोहर माने, दिलीप घुले, संपत मोरे, मारवाडे, रवी सातपुते, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एमएस-सिईटी परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

शहरासह इतर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नंबर अकोले येथील महाविद्यालयात आलेले आहेत. या परीक्षेचे ठिकाण अत्यंत लांब व दुर्गम भागात असल्याने तेथे जाण्याची पुरेशी सोय नाही. या परीक्षेसाठी बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्यावतीने परीक्षा कालावधीत अकोले याठिकाणी शहरातून जाण्यासाठी सकाळी 6 ते 7:30 यावेळेत व संध्याकाळी परतीसाठी विशेष बसची व्यवस्था करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com