अकोलेत आई पाठोपाठ मुलीचेही करोनाने निधन

अकोलेत आई पाठोपाठ मुलीचेही करोनाने निधन

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले महाविद्यालयातील सेवानिवृत्त उप प्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनील शिंदे यांची ज्येष्ठ कन्या पत्रकार सुकृता शिंदे (रा.महालक्ष्मी कॉलनी अकोले) हिचे काल पहाटे करोनामुळे निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही करोना विरूद्धची झुंज अखेर अपयशी ठरली.

सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही नऊ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय -लेकींच्या पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. आता आई व मुलीचा दशक्रिया विधी एकत्रीत करण्यात येणार आहे.

सुकृता हिने एम. ए. मराठी पर्यंत चे शिक्षण घेऊन पत्रकारीतेमध्येही पदविका प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार उमलण्याआधीच कोमेजून गेली. तिने डीएड ची पदविकाही संपादन केली होती. सुकृता हिचे लग्न जमले होते. मध्यंतरी साखरपुडा झाला होता, लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलले होते.

तिचे नियोजित पती व त्यांचे कुटुंब तिची काळजी घेत होते. तिच्या हातावर मेहंदी लागण्याआधीच ती आपल्या सर्वांना सोडून गेली. सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश शिंदे यांची ती पुतणी तर संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सात्विका शिंदे व पुणे येथे नोकरीस असणारे वैभव शिंदे यांची ती भगिनी होत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com