
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले (Akole) तालुक्यातील मन्याळे (Manyale) येथे आई (Mother) व तीच्या दोन तरुण मुलींनी (Child) आपली जीवन यात्रा संपविल्याची (Suicide) धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सुनिता अनिल जाधव (वय 48), प्राजक्ता अनिल जाधव (वय 22) आणि शितल अनिल जाधव (वय 18) अशी मृत (Death) माय लेकींची नावे आहेत.
यातील आई सुनिता जाधव हिने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली तर तीच्या दोन्ही मुलींनी गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिघींच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आईने आत्महत्या केल्याचे पाहून नंतर मुलींनी आपले जीवन संपविले असा प्राथमिक अंदाज आहे. तर मुलींनी आधी आत्महत्या (Suicide) केली. ते पाहून आईने आत्महत्या (Suicide) केल्याचे बोलले जात आहे. पोलीस तपासा नंतरच आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट होईल.
तिघींचेही मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात (Akole Rural Hospital) उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आलेले आहेत. पोलीस उपअधीक्षक राजीव सातव हेही अकोलेत दाखल झाले आहेत.