अकोलेकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

ना. थोरात यांचेकडून कौतुक, अकोले-संगमनेर हा वाद नाही
अकोलेकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले संगमनेर हा वाद नसून एकमेकाला बरोबर घेऊनच काम करायचे आहे,आज अकोलेतील 30 टक्के करोना रुग्ण संगमनेर मध्ये उपचार घेत आहे.

अकोलेमध्ये कमीत कमी 50 किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड उभे करावेत, रेमडेसीविर इंजेक्शन चा प्रश्न सोडविण्यात येईल.हा प्रश्न राज्यात नव्हे तर देशात ग्रहन झाला आहे,त्यावर उपाय योजना चालू असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.या बैठकीत राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी रेमडेसीवीर वाटपात अकोलेवर अन्याय का ? असा थेट सवाल महसूलमंत्र्यांना केला. त्यांच्या आक्रमक वक्त्यव्या मूळे बैठकीत काही काळ वातवरण तप्त झाले होते.

करोना च्या पार्श्वभूमीवर अकोले पंचायत समितीच्या सभागृहात ना.थोरात यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ना.थोरात बोलत होते. यावेळी आ डॉ सुधीर तांबे, आ.डॉ. किरण लहामटे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, डीवायएसपी राहुल मदने, तहसीलदार मुकेश कांबळे, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे,जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छीन्द्र धुमाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सोन्याबापू वाकचौरे, सुरेशराव गडाख, बाळासाहेब नाईकवाडी, रमेशराव जगताप, आरिफ तांबोळी, मंदाताई नवले, संपतराव कानवडे, विलास आरोटे, शिवाजी नेहे, अमोल नाईकवाडी, दत्ता नवले, नगरसेवक प्रमोद मंडलिक, पोलीस निरीक्षक अभय परमार, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंद्रजित गंभीरे, डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, नोडल अधिकार, अकोलेकरांनी लॉकडाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला, त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे.

लॉकडाऊन बाबत जो अनुभव आहे तो फार चांगला नाही. अनेक ठिकाणी नागरिक गांभीर्याने घेत नाहीत व त्यामुळे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अकोलेकर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निर्बंधाचे पालन करत आहेत. असे जर 30 तारखेपर्यंत नागरिकांनी गांभिर्याने पालन केले तर येत्या काही दिवसात अकोलेचा करोना रुग्णांचा आकडा सर्वात कमी राहील असे सांगत ना थोरात यांनी महसूल विभाग,नगरपंचायत, पोलीस यंत्रणा,आरोग्य विभाग यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

अकोलेकरांनी लॉकडाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला, त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे. लॉकडाऊन बाबत जो अनुभव आहे तो फार चांगला नाही. अनेक ठिकाणी नागरिक गांभीर्याने घेत नाहीत व त्यामुळे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अकोलेकर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निर्बंधाचे पालन करत आहेत. असे जर 30 तारखेपर्यंत नागरिकांनी गांभिर्याने पालन केले तर येत्या काही दिवसात अकोलेचा करोना रुग्णांचा आकडा सर्वात कमी राहील असे सांगत ना थोरात यांनी महसूल विभाग,नगरपंचायत, पोलीस यंत्रणा,आरोग्य विभाग यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेस यांच्या वतीने करोना रुग्णासाठी 10 वेगवेगळ्या औषधांचे मेडिकल किटमहसूल मंत्री ना. थोरात यांचे हस्ते नोडल ऑफिसर डॉ.श्यामकांत शेटे यांचे कडे सुपूर्त करण्यात आले. यापुढे ही गरजेनुसार मेडिकल किटचे वाटप करण्यात येईल असे जेष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com