आढावा बैठकीतील ‘त्या’ गोंधळानंतर काँग्रेस आक्रमक

आढावा बैठकीतील ‘त्या’ गोंधळानंतर काँग्रेस आक्रमक

अकोले |प्रतिनिधी| Akole

काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या समोर आढावा बैठकीत

राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर याने धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला व दंडेली करून कामकाजात अडथळा आणला. विशेष म्हणजे तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या समोर त्यांचा कार्यकर्ता असे कृत्य करतो, त्यामुळे याचा बोलविता धनी आ.डॉ.किरण लहामटे हेच आहे. असा आरोप करीत हे महाआघाडीच्या तत्वाला व व्यवहाराला घातक कृत्य त्यांनी केले.

रवी मालुंजकर हे अजून परिपक्व आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष चा राजीनामा घेऊन त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ने कारवाई करावी , व त्यांनी माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर कोणत्याच पातळीवर काम करणार नाही असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे यांनी आज अकोलेत पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

रविवारी अकोले येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या करोना आढावा बैठकीचे कवित्व अद्याप सुरूच आहे. आज याच विषयाच्या अनुषंगाने डॉ नवले यांनी फेसबुक द्वारे लोकांशी सवांद साधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या सवांदात त्यांनी अकोले तालुक्यातील काँग्रेस नेत्यांवर कोणाचेही नाव न घेता टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते मधुकरराव नवले म्हणाले की, महसूलमंत्री ना.थोरात यांच्या बैठकीत जाणून बुजून गोंधळ घालून मिटिंग हाणून पाडण्याचा डाव होता. व त्याचे समर्थन डाव्या विचारसरणीच्या नेत्याने करावे ही आश्चर्याची बाब आहे. तालुक्यात कोणी एकटा आंदोलन करीत नाही याचा मागे जाऊन इतिहास तपासावा असा टोला माकप चे नेते डॉ अजित नवले यांचे नाव न घेता लगावला. करोनाच्या गंभीर परिस्थिती आमदार महोदयांनी पालक मंत्री,आरोग्य मंत्री,उपमुख्यमंत्री यांचे कडे जाणे गरजेचे असताना शुल्लक आंदोलनात गुंतून ठेवून भोळ्या आमदारांचा फायदा कोण घेते याचा विचार खुद्द आमदारांनी करावा.

रेमडीसीविर वितरण व्यवस्थित केले नाही म्हणून राज्याचे अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटविले मग याला महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात जबाबदार कसे? असा सवाल करीत ना.थोरात यांनी अकोले- संगमनेर तालुक्यात कधीही दुजाभाव केला नाही,त्यांनी तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहे.हे अकोल्याची विसरली नाही. कोणीही दुही निर्माण करणे दोन्ही तालुक्याला परवडणारे नाही.आढावा बैठक झाल्यानंतर प्रशासनाने अजून वेग घेऊन सज्ज झाले असल्याचे दिसत आहे.आंदोलन हे निर्मळ मनाने,समाजाभिमुख असावे,व्यक्तिद्वेष ठेवून आंदोलन करू नये.काँग्रेस पक्षाचे आ.लहामटे यांना आमदार करण्यात मोठा वाटा आहे हे विसरू नये.काँग्रेस पक्षाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मागील वर्षी उत्कृष्ट कोरोनटाईन सेंटर अभिनवच्या माध्यमातून चालविले, पतसंस्थांच्या माध्यमातून योगदान दिले.

यावर्षी प्रशासनाच्या सुचनेनुसार बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपये निधी खर्च करणार असल्याचे श्री.नवले यांनी सांगितले व तसे प्रशासनाला कळविले आहे. आपणच एकटे आंदोलन करतो या आविर्भावात कोणी अहंकार ठेवून सांगू नये, तालुक्यातील सर्व पक्षाने व नेत्यांनी आंदोलने करून तालुक्याला खूप काही मिळवून दिले आहे. हा त्या सर्व आंदोलकांचा अवमान असल्याचे म्हणाले.यावर्षी युवक काँग्रेसने औषधे वाटपाचा एक टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा आज सुरू केला आहे. 25 ऑक्सिजन सिलेंडर मिळवून दिली आहेत. अजूनही काही बेड,गाद्या व इतर मदत आवश्यक असल्यास तेही देणार असल्याचे सांगितले. ना.थोरात साहेब हे राज्याचे,देशाचे नेते आहेत, त्यांचा अवमान अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते कधीही सहन करणार नाही.

त्यांचेअकोले तालुक्यासाठी मोठे योगदान आहे. हे आरोप करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे. तुम्ही केंद्र सरकारला जाब विचारणे गरजेचे असताना स्वतःला महाआघाडीत असल्याचे सांगून घटक पक्षावर आरोप करतात, हे कितपत योग्य आहे. अशी टीका नवले यांनी केली. आमदार डॉ लहामटे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावे, मित्र पक्ष म्हणविता आणि शिवसेना व काँग्रेस पक्षाला डावलण्याचा प्रयत्न करता ही बाब योग्य नाही ,अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा मधुकरराव नवले यांनी दिला.

यावेळी जेष्ठ नेते मिनानाथ पांडे म्हणाले की, जेव्हा मंत्री महोदय तालुक्यात येतात त्यावेळी त्यांचे स्वागत आमदार यांनी करणे गरजेचे आहे हा प्रोटोकॉल आहे. तुम्हाला मिटिंग चे माहीत असताना तुम्ही उशिरा का आले? या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सेना मनसे व भाजपचे प्रतिनिधी हजर होते. राज्यात महाआघाडी सरकार बनविण्यात ना.बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे. नव्हेतर सरकारच काँग्रेस मुळे आहे. हे लक्षात घ्यावे असे पांडे म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com