अकोलेत कांद्याला मिळतोय हा भाव

अकोलेत कांद्याला मिळतोय हा भाव

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akole Agricultural Produce Market Committee) दिनांक 26 जून रोजी 4697 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. एक नंबर कांद्यास 2101 प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे.

नं.1 रु 1701 ते 2101, 1 नं.2 ला रु. 1401 ते 1701, नं. 3 ला रु. 1100 ते 1551, गोल्टी रु. 551 ते 1051, खाद रु. 150 ते 500 प्रमाणे बाजारभाव मिळाले आहे.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहे. शेतकरी वर्गाने आपला कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा (Onion) वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकर्‍यांनी घ्यावी. शेतकर्‍यांनी कांदा (Onion) विक्रीस आणताना 50 किलो बारदान गोणित, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com