अकोलेत कांदा 1725 रुपये

अकोलेत कांदा 1725 रुपये

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 22/11/2022 रोजी 1402 कांदा गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1725 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. नं.1 रु 1500 ते 1725, नं.2 ला रु.1000 ते 1500, नं.3 ला रु. 700 ते 1000, गोल्टी रु. 400 ते 700, खाद रु. 150 ते 400 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा हा लिलाव वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने कांदा वजन लिलावाच्या दिवशी सकाळी 8 ते लिलाव संपेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी घ्यावी, शेतकरी बंधूंनी कांदा विक्री करताना, ज्या व्यक्तीचे नावे 7/12 क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव, गाव व इतर माहिती कांद्याची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी, 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सर्जेराव कांदळकर व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com