अकोलेत मंडलाधिकारी, तलाठी यांचे तहसील आवारात धरणे आंदोलन

अकोलेत मंडलाधिकारी, तलाठी यांचे तहसील आवारात धरणे आंदोलन

अकोले (प्रतिनिधी)

महासंघाचे राज्य अध्यक्ष डूबल यांना आर्वच्च भाषा वापरुन अपमानित करनार्या, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणेचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची तातडीने बदली करा अन्यथा तीव्र अंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी महासंघाच्या वतीने देण्यात आला. या निमित्ताने अकोले तहसील कार्यालय आवारात धरणे अंदोलन करत निदर्शने ही करण्यात आली. या आंदोलनात तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

महासंघाचे राज्य अध्यक्ष डूबल यांना जगताप यांनी अर्वाच्च भाषा वापरत अपमानित केले. यावरून राज्यभर आज ठिकठिकाणी धरणे अंदोलन करीत तिव्र शब्दात निषेध केला असून जगताप यांची तातडीने बदली न झाल्यास ऊद्या दि.12 रोजी राज्यभर सर्व मंत्री, आमदार, खासदार यांना महासंघाच्या वतीने निवदने देण्यात येती. तर 13 तारखेला कामावर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे म्हणाले की, मंडलाधिकारी, तलाठी हे सर्व लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असून तोकड्या सुविधा आणि येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्या, प्रसंग, नैसर्गिक संकट यातुन सर्वसमान्य माणसाना सेवा देणे, ई पिक पाहणी असेल किंवा अशी अनेक कामे अनेक आघाड्या आम्ही सर्व काम करीत असताना अपमानित करने चुकीचे असून हा आमच्या वर अन्याय असल्याची भावनाही दातखिळे यांनी व्यक्त केली.

यावेळी अकोलेचे तहसीलदार थेटे यांना निवेदन ही देण्यात आले. यावेळी मंड़लाधिकारी गिरीष कुलकर्णी, किसन लोहरे, संजय देशमुख, प्रीती वर्पे, यांच्यासह अकोले तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षा सुनंदा बांबले, कार्याध्यक्ष प्रवीण ढोले, उपाध्यक्ष सचिन मांढरे, सचिव प्रमोद शिंदे, संतोष जाधव, राजेन्द्र लोखंडे, जॉर्ज कांबळे, फापाळेआदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.