सरकारने काळ्या आईच्या लेकरांना वर्षभर खीतपत ठेवले - मधुकरराव नवले

सरकारने काळ्या आईच्या लेकरांना वर्षभर खीतपत ठेवले - मधुकरराव नवले

अकोले (प्रतिनिधी)

भांडवलदारांना मालामाल आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणारे काळे कायदे रद्द व्हावेत याकरिता बळीराजाने वर्षभर लढा दिला. या कायद्याविरोधात आम्ही नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली. मोदी सरकारने हे काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे.

परंतु ही बाब काहीअंशी समाधान देणारी जरी असली तरी हा निर्णय घ्यायला सरकारने काळ्या आईच्या लेकरांना वर्षभर खीतपत ठेवले, त्यात ७०० लोकांचा बळी गेला. त्यावेळी सरकारला दया का आली नाही? असा सवाल राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

वर्षभर केंद्र सरकारची असंवेदनशीलता सर्व देशाने बघितली. प्रत्येक राज्यात या घटनेचे पडसाद उमटत असताना शेतकऱ्यांचा असंतोष वाढला. याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया मधुकरराव नवले यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com