कृषी कायदे रद्द करून लोकशाहीमध्ये शेतकरी नेते, विरोधी पक्षाचा मान राखला - पिचड

कृषी कायदे रद्द करून लोकशाहीमध्ये शेतकरी नेते, विरोधी पक्षाचा मान राखला - पिचड

अकोले (प्रतिनिधी)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशासाठी लागू केलेले ३ कृषी कायदे रद्द केले व लोकशाहीमध्ये शेतकरी नेते, विरोधी पक्षाचा मान सन्मान राखला, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू झालेले तीन कृषी कायदे परत मागे घेण्याची घोषणा केली. लोकशाहीमध्ये शेतकरी नेत्यांचे व विरोधी पक्षांच्या म्हणण्यास महत्त्व देऊन वेळप्रसंगी आपला आग्रह सोडून देण्याचे धैर्य दाखविले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो.

कायदे रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, तसेच मोदी सरकार हे हुकूमशहा नसून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहेत. त्यांची काहींनी हुकूमशहा म्हणून तयार केलेली प्रतिमा या निर्णयामुळे पुसली जाणार आहे. मोदी हे शेतकऱ्यांच्या बाजूचे असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, असेही माजी मंत्री पिचड यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com