रोहयोमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी खर्च व अत्यल्प कामे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष - वैभव पिचड
वैभव पिचड

रोहयोमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी खर्च व अत्यल्प कामे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष - वैभव पिचड

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील रोजगार हमी योजनेवर इतर तालुक्यांच्या  तुलनेत कमी खर्च करुन अत्यल्प प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नी अजिबात लक्ष नाही, अशी टिका माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून करोना या महामारीत आजाराने थैमान घातलेले आहे. तालुक्यातील असंख्य जनतेच्या हाताला कामे नाहीत पर्यायाने आपले कुंटुंब कसे बसे चालविण्याचे कसरत करावी लागत आहे. याकडे अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचे अजिबात लक्ष नाही. अशातच जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र सन 2020-21 रोजगार हमी योजनेवर जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रमाणात खर्च केलेला आहे. व रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे असे निदर्शनास येत आहे. या तुलनेत अकोले तालुक्यात मंजुरांची संख्या लक्षणिय आहे. परंतु त्यांच्या हाताला कामे नाहीत, आपले कुंटुंब कसे चालवावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

वैभव पिचड
श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा आदिक यांचा भाजप पदाधिकाऱ्यावर ५ कोटींचा दावा

अकोले तालुक्यात भात आवणी, नागली, वरई आवणी इत्यादीची कामे आता सुरु होत आहे. ही आवणी कशा प्रकारे करावी बैल जोडीने नांगरणी करणे आणि ट्रक्टरने नांगरणी करणे यासाठी फार मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे हा खर्च कसा करावा असा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. कारण हाताला कामे नाहीत हा आवणीचा खर्च कसा करावा की सावकारांकडून कर्ज घ्यावेत, पण घेतलेले कर्ज कसे फेडायचे असाही प्रश्न येथील जनतेला भेडसावत आहे. तरी अकोले तालुक्यासाठी रोजगार हमीचे कामे जास्तीत जास्त उपलब्ध करुन दयावेत व भात आवणी, नागली व वरई आवणी आणि बैल जोडीने नांगरणी करणे, ट्रक्टरने नांगरणी करणे ही सर्व कामे रोजगार हमी योजनेत बसून त्यासाठी तातडीने मंजुरी देवून येथील जनतेला मदतीचा हात द्यावा, तालुक्यातील जनतेला उपासमारीपासून वाचवावे अशी विनंती माजी आमदार पिचड यांनी केली आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जामखेड - 6.84 कोटी, कर्जत -8.95 कोटी, नगर- 4.48 कोटी, पारनेर - 8.90 कोटी, पाथर्डी- 5.82 कोटी, संगमनेर-5.33 कोटी, शेवगांव- 4.72 कोटी, श्रीगोंदा- 5.65 कोटी रुपये मात्र अकोले तालुक्यासाठी फक्त 3.62 कोटी रुपये. अकोले तालुक्यासाठी इतका कमी खर्च का करण्यात आला आहे? याकडे अकोले तालुक्याचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे माजी आमदार पिचड यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com