अकोले विधानसभेची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार
अकोले |प्रतिनिधी| Akole
पहिल्या स्वतंत्र्याच्या लढाई नंतर दुसरी स्वातंत्र्याची लढाई 2024 पर्यंत लढावी लागणार आहे. हि लढाई जिंकलो तरच लोकशाही व राज्यघटना टिकेल अन्यथा देशात पारतंत्र्य व हुकूमशाही अटळ आहे, असे सांगत जोपर्यंत आपल्या काँग्रेसच्या विचाराचा खासदार, आमदार होत नाही तोपर्यंत जनसंवाद यात्रेचे काम सुरूच ठेवा.अकोले विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळवण्यासाठी आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी करु, असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जनसंवाद यात्रेचे अकोले शहरात मिरवणुकीने उत्साहात स्वागत करण्यात येऊन महाराजा लॉन्स येथे जनसंवाद सभा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस महिला आघाडीच्या महासचिव उत्कर्षाताई रुपवते, हेमंत ओगले, तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, युवा नेते सतिष भांगरे, मदन पथवे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब नाईकवाडी, सोन्याबापु वाकचौरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल नाईकवाडी, नगरसेवक प्रदिपराज नाईकवाडी, विलास आरोटे, कारखान्याचे संचालक पाटीलबा सावंत, डॉ. डी. के. सहाणे, रमेशराव जगताप, मंदाताई नवले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, मागील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला लिड या अकोले मतदार संघाने दिलेले असुन अकोले तालुक्याची विचारधारा समतेची, एकात्मतेची अर्थात काँग्रेसची विचारधारा मानणारा तालुका आहे. पिचडांचा तालुक्यात एवढा प्रभाव असतानाही मागील निवडणुकीत पिचड जातियवादी विचारसरणीच्या भाजपा बरोबर गेले तर तालुक्यातील जनतेने त्यांना नाकारून विचारांची ताकद आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे. देशात व राज्यात आज वातावरण बदलु पाहत आहे. देशात जे सुरु आहे ते थांबवायचे काम करायचे आहे, वेगळ्या दिशेने देश नेण्याचे काम सुरु असुन उद्या हे पुन्हा आले तर लोकशाही संपेल राज्यघटना मोडून पडेल, त्यामुळे आपले काँग्रेसचे विचार पुढे नेण्यासाठी लोकांशी संवाद करावा लागेल.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, काँग्रेस महिला आघाडीच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रस्तविक व स्वागत काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी केले सूत्रसंचलन सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नेहे व आरीफ तांबोळी यांनी केले तर आभार बाळासाहेब शेटे यांनी मानले.
यावेळी भास्कर दराडे, साईनाथ नवले, महिपाल देशमुख, सचिन जगताप, अनिल वैद्य, अलका मंडलिक, माजी नगराध्यक्षा संगिताताई शेटे, प्रतिभाताई घुले, प्रवीण देठे, अॅड. के. बी. हांडे, फैजान तांबोळी, मीनाक्षी शेंगाळ सह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.