अकोलेकरांचे स्वप्न भंगले का ?

कोल्हार-घोटी हायवेची दैना; प्रवास झाला जीवघेणा
अकोलेकरांचे स्वप्न भंगले का ?

कळस |वार्ताहर| Kalas

गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हार- घोटी राज्यमार्गाला खड्ड्याचे पुरते ग्रहण लागले आहे. गेल्या तीन- चार वर्षांपूर्वी कसेतरी हा रस्ता मंजूर होऊन काम सुरू झाले त्यामुळे अकोलेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण काम सुरू झाले पण तेही धिम्यागतीने त्यात विधानसभेच्या निवडणुका आल्या उमेदवारांनी आपाआपला स्वार्थ साधत रस्त्याचे राजकारण केले आणि धिम्यागतीने चाललेला हा रस्ता मध्यंतरी बंदच पडला.

लोकांनी आंदोलन करून, मोर्चे करून कसातरी चालू केला आणि जागोजागी एक्साईड पट्टी टाकून लोकांची मनधरणी ठेकेदारानी केली. मग जागोजागी साईडपट्ट्या करून चिखलाचे साम्राज्य करून लोकांशी जिवाशी खेळणं चालू झाले त्यात दोन वर्षे निघून गेले. रस्ता चालू होता पण अकोलेच्या खाली काही येईना. मग अकोले -संगमनेरच्या मधल्या गावांनी रस्त्यासाठी आंदोलन केले आणि कसातरी रस्ता अकोल्याच्या खाली उतरला. कुठेतरी काम सुरू झाले आणि संगमनेरकरांनी रस्त्याच्या कामाची मागणी केली मग काय साहेबांचा तालुका? मग ठेकेदाराने सर्व साधनं उचलली आणि संगमनेर हद्दीचे काम जोमाने सुरू केले.

तोपर्यंत अकोल्यात केलेल्या अर्धवट उत्खननात एका तरुणाचा जीव गेला. मग परत ठेकेदारांनी एक पट्टी मध्ये टाकून सगळ्यांच्या मनाचे समाधान केले. यापेक्षाही इतिहास बरच सांगून जातो. आता तर काय पावसाचे कारण देत रस्त्याचे कामच बंद आहे. अनेकवेळा रस्त्याचे बदलेले इस्टीमेट आणि राज्यमार्गाचा खेळखंडोबा याबाबत तालुक्यातील पुढारी काहीच कसे बोलत नाही याचेच आश्चर्य वाटते ! सद्यस्थितीला कोल्हार-घोटी हायवेची परिस्थिती पुन्हा खालावली आहे. जी एक पट्टी डांबरीकरण केले ती अक्षरशः बर्‍याच ठिकाणी उखडून गेली आहे त्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले रस्ते जर चार महिन्यांत उखडत असतील तर हा प्रकार नेमकी काय आहे हे तपासले पाहिजे. पण प्रशासन आणि तालुक्यातील पदाधिकारी याकडे मात्र निमुटपणे पाहत आहेत.

अकोल्याकडे जाताना कळस येथे झोडगे वस्ती, एस कॉर्नर, सुगाव फाटा, आणि रोकडोबापासून तर अकोल्यापर्यंत जाताना मोठी कसरत आणि जीव मुठीत धरून जावे लागतेयं.त्यात चिखलाचे सामाज्य आणि खड्ड्यांमुळे कधी अपघात होईल सांगता येत नाही. याकडे दरवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले तरी तेवढ्यापुरते तोंडाला पाने पुसतात. त्यामुळे या अकोले तालुक्यातील जनतेला कोणी वाली नाही असे वाटायला लागले आहे. त्यामुळे नव्या रस्त्याचे स्वप्न भंगले की काय? असे वाटायला लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com