इंदोरी परिसराला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले

इंदोरी परिसराला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले

इंदोरी |वार्ताहर| Indori

अकोले तालुक्यातील इंदुरी, रुंभोडी, मेहंदुरी परीसराला सोमवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागिल आठवड्यापासून चार पाच दिवस पावसाने हजेरी लावली आहे.

कांदा ऊत्पादकांची मात्र पावसाने धांदल ऊडवली. सोसाट्याचा वारा असल्याने कांदा ढिगांवर टाकलेले ताडपत्री ऊडल्याने कांदा भिजला. आनेक शेतकर्‍यांचा कांदा शेतातून काढायचा राहील्याने तो सडण्याचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो बांधणीसाठी आले होते. मात्र पावसाने झोडपून काढल्याने टोमॅटो ऊत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे.

वादळामुळे आंब्याच्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला आहे. ऊस तोडणी हंगामाचे अंतिम दोन, तिन दिवस राहीले आहे. मात्र त्याचं ही नियोजन पावसानं कोलमडलं आहे. वातावरणातील ऊष्णता कमी झाली तरी पावसाने नुकसान. मात्र वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com